आठव्या टी20 विश्वचषकाची (T20 World Cup)धमाकेदार सुरूवात झाली आहे. शनिवारी (22 ऑक्टोबर) झालेल्या सुपर 12च्या पहिल्याच सामन्यात यजमान संघ पराभूत झाला आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियावर 89 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांनाबरोबर गोलंदाजांनीही अनेक विक्रम केले आहेत. त्यांचा वेगवान गोलंदाज टीम साऊदी याने डेविड वॉर्नर याची विकेट घेताच आंतरराष्ट्रीय टी20मधील मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
टीम साऊदी (Tim Southee) याच्याकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध ज्या सुरूवातीची अपेक्षा होती, तशीच जबरदस्त सुरूवात केली. त्याने त्याच्या पहिल्याच षटकात विरोधी संघाला धक्का दिला. त्याने ऑस्ट्रेलियाच्या डावातील दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर डेविड वॉर्नर (David Warner) याला 5 धावांवर त्रिफळाचीत केले. ही विकेट साऊदीची आंतरराष्ट्रीय टी20मधील 123वी विकेट ठरली आहे. याबरोबरच तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला.
साऊदीने हा विक्रम करताना बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याला मागे टाकले आहे. शाकीबने आतापर्यंत 104 सामन्यात 122 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 71 सामन्यात 118 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने टी20 विश्वचषकाच्या इतिहासात एक मोठा विक्रमही रचला आहे.
आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज-
125* – टीम साऊदी
122* – शाकिब अल हसन
118* – राशिद खान
107 – लसिथ मलिंगा
साऊदीचा हा 101वा आंतरराष्ट्रीय टी20 सामना होता. त्याने या सामन्यात 2.1 षटकात 6 धावा देत 3 विकेट्स घेतल्या आहेत. यामुळे क्रिकेटच्या या छोट्या प्रकारामध्ये त्याच्या आतापर्यंत 125 विकेट्स झाल्या आहेत. त्याचबरोबर तो टी20 विश्वचषकामध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा न्यूझीलंडचा गोलंदाज म्हणून आघाडीवर आहे. तसेच त्याने पहिल्यांदाच टी20मध्ये वॉर्नरला बाद केले आहे.
टी20 विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारे न्यूझीलंडचे खेळाडू-
24* – टीम साऊदी
23 – नॅथन मॅक्युलम
20* – इश सोधी
20 – डॅनियल विट्टोरी
17* – ट्रेंट बोल्ट
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महामुकाबल्यातून पाकिस्तानचा हुकमी एक्का बाहेर! टीम इंडियाला दिलेली मोठी जखम
देशांतर्गत क्रिकेट गाजवतोय इशान किशन, ओडिसाविरुद्ध केलेले शतक ठरले ऐतिहासिक