भारतीय संघानं 17 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर टी20 विश्वचषकाची ट्रॉफी जिंकली. विजेतेपदाचा सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाला चमकदार टी20 ट्रॉफी मिळाली आहे. मात्र भारताला मिळालेली ट्रॉफी कशी बनवली जाते हे तुम्हाला माहिती आहे का? टी20 विश्वचषक ट्रॉफीसंबंधी अनेक प्रश्न तुमच्या मनात आले असतील. चला तर मग, या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतो.
टी20 विश्वचषक 2007 मध्ये सुरू झाला. पहिल्या विश्वचषकात महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं सर्वांना धक्का देत जेतेपद पटकावलं. आतापर्यंत या स्पर्धेच्या नऊ आवृत्त्या खेळल्या गेल्या आहेत. तेव्हापासून स्पर्धेच्या सर्व विजेत्यांना एकाच प्रकारची ट्रॉफी देण्यात आली आहे. ट्रॉफीच्या डिझाइनमध्ये अद्याप कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
टी20 विश्वचषक ट्रॉफी लंडनची प्रसिद्ध कंपनी लिंक्स ऑफ लंडन (Links of London) ने डिझाईन केली आहे. ही कंपनी इंग्लंडची प्रसिद्ध ज्वेलरी कंपनी फोली फोलीचा सब-ब्रँड आहे. टी20 विश्वचषक ट्रॉफी बनवण्यासाठी चांदी आणि रोडियम या दोन धातूंचा वापर करण्यात आला आहे. रोडियम हे चांदीसारखंचं धातू आहे, जे प्लॅटिनममध्ये आढळते.
टी20 विश्वचषक ट्रॉफीची लांबी 51 सेंटीमीटर आहे. ट्रॉफीच्या वरच्या भागाची लांबी 19 सेंटीमीटर आहे. तर ट्रॉफीच्या पायाची रुंदी 14 सेंटीमीटर आहे. ट्रॉफीच्या वजनाबद्दल बोलायचं झालं तर, ट्रॉफीचं वजन 7.5 किलो आहे. टी20 विश्वचषक जिंकणाऱ्या प्रत्येक संघाचं नाव ट्रॉफीवर लिहिलेलं असतं.
तुम्हाला कदाचित ही गोष्ट माहित नसेल की, प्रत्येक विजेत्या संघाला बनावट ट्रॉफी दिली जाते. खरी ट्रॉफी आयसीसीकडेच ठेवली आहे. भारताशिवाय इंग्लंड (2010 आणि 2022) व वेस्ट इंडिज (2012 आणि 2016) हे दोनच संघ आहेत, ज्यांनी दोनदा टी20 विश्वचषक जिंकला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत-पाकिस्तान सामन्याची क्रेझ! अवघ्या काही क्षणांत अख्खं स्टेडियम हाऊसफुल्ल
झिम्बाब्वेचे मुख्य प्रशिक्षक आहेत शुबमन गिलचे फॅन, भारतीय कर्णधारावर केला कौतुकाचा वर्षाव
झिम्बाब्वेविरुद्ध तीन भारतीय खेळाडूंचं पदार्पण, आयपीएल 2024 मध्ये केली होती चमकदार कामगिरी