आशिया कप 2025 संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये खेळवला जाणार आहे. या स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होईल आणि अंतिम सामना 28 सप्टेंबर रोजी खेळला जाईल. आशिया कपमध्ये आठ संघ सहभागी होणार आहेत, ज्यामधील सात देशांनी आपापल्या संघांची घोषणा आधीच केली आहे. फक्त यूएई हा एकमेव देश आहे, ज्याने अजून संघ जाहीर केलेला नाही. यावेळी आशिया कप टी20 फॉरमॅटमध्ये होणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्याआधी एकदा पाहूया की आयसीसी टी20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत हे आठ संघ कोणत्या स्थानावर आहेत आणि कोणता संघ सर्वात वरती आहे.
आयसीसी टी20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत भारताचे वर्चस्व कायम आहे. भारत फक्त आशियातच नव्हे, तर जगातील सर्व देशांमध्ये टी20 क्रिकेटमध्ये नंबर वन आहे. टीम इंडिया आयसीसी टी20 आंतरराष्ट्रीय टीम रँकिंगमध्ये 217 रेटिंग पॉइंट्ससह अव्वल स्थानावर आहे. भारताने टी20 वर्ल्ड कप 2024 जिंकून जगाला दाखवून दिले की टीम इंडिया हाच या फॉरमॅटचा खरा चॅम्पियन आहे. या वर्ल्ड कपनंतर रोहित शर्माने निवृत्तीची घोषणा केली आणि त्यानंतर सूर्यकुमार यादवला संघाची कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली.
आशिया कपच्या संघांमध्ये टी20 क्रमवारीत भारत 271 रेटिंग पॉइंट्ससह पहिल्या स्थानावर आहे.
आशिया कप 2025 खेळणाऱ्या संघांपैकी श्रीलंका 232 रेटिंग पॉइंट्ससह आयसीसी टी20 क्रमवारीत 7व्या स्थानावर आहे. पाकिस्तान 231 रेटिंग पॉइंट्ससह 8व्या क्रमांकावर आहे.
अफगाणिस्तान 223 रेटिंग पॉइंट्ससह 9व्या स्थानावर आहे. बांगलादेश 221 रेटिंग पॉइंट्ससह आयसीसी टी20 टीम क्रमवारीत 10व्या क्रमांकावर आहे. संयुक्त अरब अमिरातीची टीम या यादीत 180 रेटिंग पॉइंट्ससह 15व्या स्थानावर आहे.
ओमान 146 रेटिंग पॉइंट्ससह आयसीसी टी20 क्रमवारीत 20व्या क्रमांकावर आहे.आयसीसी टी20 टीम क्रमवारीत हाँगकाँग चीन 128 रेटिंग पॉइंट्ससह 24व्या स्थानावर आहे.






