---Advertisement---

T20WC FINAL: अंतिम सामन्यात पाकिस्तान ढेपाळला! विश्वविजयासाठी इंग्लंडसमोर 138 धावांचे लक्ष्य

England-Cricket-Team
---Advertisement---

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना इंग्लंड आणि पाकिस्तान (ENGvPAK) यांच्या दरम्यान खेळला गेला. मेलबर्न येथील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या या सामन्यात इंग्लडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडने आपला गोलंदाजीचा निर्णय सार्थ ठरवत पाकिस्तानला निर्धारित 20 षटकात 8 बाद 137 धावांवर रोखले. फिरकीपटू आदिल रशिद व सॅम करनने उपांत्य सामन्यानंतर अंतिम सामन्यातही शानदार गोलंदाजी केली.

दुसरे विजेतेपद पटकावण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या या दोन्ही संघांनी या सामन्यासाठी संघात कोणताच बदल केला नाही. प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर पाकिस्तानसाठी बाबर व रिझवान यांनी 29 धावांची भागीदारी केली. रिझवान या सामन्यात केवळ 15 धावांचे योगदान देऊ शकला. युवा मोहम्मद हारीस या सामन्यात अपयशी ठरला. बाबरने 28 चेंडूवर 32 धावांची संथ खेळी केली. शान मसूदने 38 तर शादाब खानने 20 धावांचे योगदान दिले.

तळातील फलंदाज पाकिस्तानसाठी फारसे योगदान देऊ शकले नाहीत. इंग्लंडच्या गोलंदाजांनी नियंत्रित गोलंदाजी करत पाकिस्तानच्या फलंदाजांना फटकेबाजी करू दिली नाही.‌ पाकिस्तानसाठी सॅम करनने सर्वाधिक तीन बळी टिपले. तर, जॉर्डन व करन यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले.

(t20wc-final England need 138 for win)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---