टी-20 विश्वचषक 2022 चा दुसरा उपांत्य सामना गुरुवारी (10 नोव्हेंबर) भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला. उभय संघांतील ही लढत एडिलेड ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. बुधवारी (9 नोव्हेंबर) पहिल्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडला 7 विकेट्सने पराभूत करत अंतिम सामना गाठला. आता दुसऱ्या उपांत्य सामन्यात जिंकणारा संघ अंतिम सामन्यात पाकिस्तानसोबत खेळेल. रविवारी एडिलेडमध्ये इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
उभय संघांतील या महत्वाच्या सामन्यात इंग्लंडला दोन मोठे झटके मिळाले. मध्यक्रमातील फलंदाज डेविड मलान आणि वेगवान गोलंदाज मार्क वुड यांना प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर ठेवले गेले. तर दुसरीकडे भारतीय संघात दिनेश कार्तिक ऐवजी यष्टीरक्षक फलंदाजाच्या रूपात रिषभ पंतला खेळण्याची संधी दिली गेली. चालू टी-20 विश्वचषकात पंतचा हा दुसरा सामना असेल.
???? Toss & Team News from Adelaide ????
England have elected to bowl against #TeamIndia in the #T20WorldCup semi-final. #INDvENG
Follow the match ▶️ https://t.co/5t1NQ2iUeJ
Here's our Playing XI ???? pic.twitter.com/9aFu6omDko
— BCCI (@BCCI) November 10, 2022
दोन्ही संघांची प्लइंग इलेव्हन –
भारत- केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.
इंग्लंड- जोस बटलर (कर्णधार, विकेटकीपर), ऍलेक्स हेल्स, फिलिप सॉल्ट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करान, ख्रिस जॉर्डन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद. (t20wc2022 ind vs eng england won the toss and chose to field first)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानच्या विजयाने आयसीसी ट्रोल; चाहत्यांनी म्हटले, ‘दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडला पंचांच्या मदतीने…’
टी20मध्ये सर्वाधिक शतके, 14 अर्धशतके; इंग्लंडविरुद्ध भारताने पाडला धावांचा पाऊस, जाणून घ्या अव्वल कोण?






