पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympic) 2024 दरम्यान अल्जेरियन महिला बॉक्सर लिंग विवादात अडकली होती. इमान खलीफ नावाच्या बॉक्सरला आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यापासून रोखण्यात आले कारण तिच्यामध्ये टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले होते. मात्र, ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान सोशल मीडियावर खलिफसाठी अपशब्द वापरले गेले. आता बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूनंही (Taapsee Pannu) या प्रकरणाबद्दल वक्तव्य केलं आहे.
एएनआयशी (ANI) बोलताना, तापसी पन्नूनं (Taapsee Pannu) या विषयावर वक्तव्य केलं आणि सांगितलं की तिनं ‘रश्मी रॉकेट’ हा चित्रपट केला आहे. त्या चित्रपटातही महिला खेळाडूची लिंग चाचणी केली जाते. ती म्हणाली, “मी याच विषयावर एक चित्रपट केला होता. रश्मी रॉकेटमध्ये महिला ॲथलीटवर टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण जास्त असल्याने तिच्यावर बंदी घालण्यात आली आहे.”
तापसी पन्नूने सांगितले की, तिच्या चित्रपटाचा आधार हा नियम होता ज्या अंतर्गत ॲथलीट्स उच्च टेस्टोस्टेरॉन पातळीमुळे अपात्र ठरतात. या विषयावर तापसी म्हणाली की, एखाद्या व्यक्तीच्या हार्मोन्सवर नियंत्रण नसते. रश्मी रॉकेटमध्ये हाच मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे की काही खेळाडू इतरांपेक्षा जास्त ताकद घेऊन जन्माला येतात.
तिनं उदाहरण देताना असेही सांगितले की, “उसेन बोल्ट आणि मायकेल फेल्प्ससारखे खेळाडू जन्मापासूनच जैविक आधारावर इतरांपेक्षा सरस आहेत, मग त्यांच्यावर बंदी का नाही? स्पष्टपणे सांगायचे तर, इंजेक्शन किंवा कोणत्याही प्रकारची औषधे घेणं योग्य नाही.”
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-पाकिस्तान यांच्यात 18 वर्षांनंतर होणार कसोटी सामना! जाणून घ्या संपूर्ण समीकरण
PAK vs BAN: शान मसूदला बाद देण्यावर झाला वाद, अंपायरमुळे मैदानावर गोंधळ! VIDEO
“पुन्हा एकदा जगातील सर्वोत्तम…” भारतीय संघाबद्दल प्रशिक्षकानं केला मोठा खुलासा