Football

Premier League: मॅन्चेस्टर सिटीची प्रिमियर लीगमधील स्वप्नवत सफर

डिसेंबर 24, 2017

प्रिमियर लीग मध्ये आज प्रत्येक संघाला धाक बसलाय तो मॅन्चेस्टर सिटीचा असे आपण कालच्या सामन्यानंतर नक्कीच बोलू शकतो. लीगचे प्रत्येक संघाचे १९ सामने झालेत आणि लीग बरोबर अर्धी संपली असतानाच विजेता संघ जवळजवळ स्पष्ट झाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. १९ सामन्यात १८ सामने जिंकत ५५ गुणांसह पेप गार्डिओलाची मॅन्चेस्टर सिटी पहिल्या स्थानावर आहे आणि दुसऱ्या स्थानावरील मॅन्चेस्टर युनाएटेडपेक्षा थोडेथोडके नाही तर तब्बल १३ गुणांच्या फरकाने घेतलेली ही आघाडी सिटीला नक्कीच या वर्षीच्या प्रिमियर लीगवर आपले नाव कोरण्यास मदत करेल. काल झालेल्या सामन्यात आपल्या घरच्या मैदानावर बाॅर्नेमाॅथचा ४-० ने पराभव करत सिटीने सलग १७ वा विजय नोंदवला. मागील ८ महिन्यात सिटीने एक पण प्रिमियर लीगचा सामना गमावला नाही. काल सिटी तर्फे ॲगुवारोने २ तर डॅनिलो आणिस्टर्लिंगने प्रत्येकी १-१ गोल नोंदवला. ॲगुवारो आणि स्टर्लिंगने प्रत्येकी १-२ गोलला असिस्ट सुद्धा केले. पहिल्या हाफ मध्ये २७ व्या मिनिटला बाॅर्नेमाॅथच्या गोलकिपरच्या चुकीमुळे सिटीने बाॅलवर ताबा मिळवला आणि फर्नडिन्होच्यापासवर ॲगुवारोने हेडर मारत सिटी साठी पहिला गोल केला. हा ॲगुवारोचा सिटीच्या घरच्या मैदानावर १०० वा गोल होता. सिटीसाठी ७९ व्या मिनिटला तिसरा आणि ॲगुवारोचा दूसरा गोल पण हेडरच होता. प्रिमियर लीगच्या एकाच सामन्यात हेडरने दोनगोल करायची ॲगुवारोची ही पहिलीच वेळ होती. या मौसमातील ११ मधुन ७ गोल्स शेवटच्या १० मिनिटात करणार्या स्टर्लिंगने सामन्याच्या ५३ व्या मिनिटला ॲगुवारोच्यापासला उजव्या कोपर्यातुन मारत सिटीचा दूसरा आणि आपला १२ वा गोल केला. शेवटच्या मिनिटात गोल साठी प्रसिद्ध झालेल्या स्टर्लिंगने बाॅल आपल्या ताब्यात घेत बदली खेळाडू म्हणुन आलेल्या डिफेंडर डॅनिलोकडे दिला आणि त्याने त्याचे गोल मध्ये रुपांतर करत सिटी साठी आपला पहिला गोल नोंदवला तर स्टर्लिंगने आपल्या नावे एक असिस्ट नोंदवला. # सिटीने २०१७ वर्षात १००+ गोल्स करत १९८२ च्या लीवरपुलच्या १०६ गोल्स नंतर असा पराक्रम करणारा पहिला संघ ठरला. # या मौसमात युरोपच्या टाॅप ५ लीग मध्ये अपराजित राहणार्या २ संघांमधून मॅन्चेस्टर सिटी हा १ संघ आहे. # युरोपच्या टाॅप ५ लीगमध्ये सर्वाधिक सामने लागोपाठ जिंकायच्या यादीत सिटी १७ विजयासह दूसर्या स्थानावर आहे तर२०१३-१४ च्या १९ विजयासह बायर्न म्युनिच पहिल्या स्थानी आहे. विशेष म्हणजे तेव्हा पण बायर्नचा मॅनेजर पेप गार्डिओलाच होता. # आपल्या घरच्या मैदानावर या वर्षी सिटीने एक पण सामना गमावला नाही. झालेल्या २६ सामन्यात २१ विजय तर ५ सामने बरोबरीत सुटले.

La Liga: सॅंटियागो बर्नब्यूवर पुन्हा एकदा मेस्सीच्या बार्सिलोनाचा बोलबाला

डिसेंबर 24, 2017

लिओनेल मेस्सीच्या एफसी बार्सिलोनाने सॅंटियागो बर्नब्यूवर पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत रियल मॅड्रिडचा ०-३ ने पराभव केला. बार्सिलोनातर्फे सुवारेज, मेस्सी आणि बदली खेळाडू म्हणून....

ISL: दिल्लीला हरवून एटीकेचा सलग दुसरा विजय

डिसेंबर 23, 2017

कोलकाता: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) दोन वेळा विजेतेपद मिळविलेल्या एटीकेने चौथ्या मोसमात फॉर्म गवसताच टॉप गिअर टाकण्यास सुरवात केली आहे. मार्की खेळाडू रॉबी किन याच्या....

ISL: गोव्यात दोन गोलसह पुणे सिटीचा विजय साजरा

डिसेंबर 23, 2017

फातोर्डा (गोवा): हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) चौथ्या मोसमात धडाकेबाज फॉर्म गवसलेल्या एफसी गोवा संघाला शनिवारी रंगतदार लढतीत एफसी पुणे सिटीने 2-0 असे हरविले. दुसऱ्या सत्रात....

La Liga: एल क्लासिकोमध्ये आज बार्सिलोना ठरू शकते वरचढ?

डिसेंबर 23, 2017

जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळातील सर्वाधिक लोकप्रिय सामना समजल्या जाणाऱ्या एल क्लासीकोला अवघे काही तास उरले आहेत. रियल मॅड्रिड विरुद्ध बार्सिलोना असा सामना उद्या भारतीय वेळेनुसार....

ISL: नॉर्थईस्ट युनायटेड विरुद्ध बलवंत ठरला मुंबईचा हिरो

डिसेंबर 20, 2017

गुवाहाटी: मुंबई सिटी एफसीने हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) बाहेरील मैदानावरील सामन्यात (अवे मॅच) चौथ्या मोसमात पहिलावहिला विजय मिळविला. नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरुद्ध बलवंत सिंगच्या दोन गोलांच्या....

ISL 2017: नॉर्थईस्टसमोर आज मुंबई सिटीच आव्हान

डिसेंबर 20, 2017

गुवाहाटी | हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) बुधवारी नॉर्थईस्ट युनायटेड एफसीची मुंबई सिटी एफसीविरुद्ध लढत होत आहे.   नॉर्थईस्टला पहिल्या पाच समन्यांत केवळ चार गुण मिळविता....

ॲटलेटिको डी मॅड्रिडची बार्सिलोना विरुद्ध फिफाकडे तक्रार

डिसेंबर 20, 2017

येत्या १ जानेवारी पासून फुटबाॅल ट्रांस्फरची विंडो उघडणार आहे. जरी उन्हाळ्यातली ट्रांस्फर विंडोही खेळाडूंच्या ट्रांस्फरसाठी प्रसिद्ध असली तरी या हिवाळी विंडोमध्ये काही मोठ्या खेळाडूंच्या ट्रांस्फरची....

येत्या शनिवारी रंगणार एल क्लासीकोचा थरार

डिसेंबर 18, 2017

आज ला लीगच्या १६ व्या आठवड्याचे जवळजवळ सर्व सामने पार पडले. गुणतालीकेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या बार्सिलोनाने आपले स्थान अधिक मजबूत केले तर व्हॅलेन्सियाला पराभवाचे तोंड....

Premier League: मॅन्चेस्टर सिटीचा दबदबा कायम, टोट्टेन्हमचा केला ४-१ असा पराभव

डिसेंबर 17, 2017

काल प्रिमियर लीगच्या १८ व्या आठवड्याच्या पहिल्या दिवसाचे सामने पार पडले. अर्सेनल, चेल्सी, मॅन्चेस्टर सिटी, टोट्टेन्हम हाॅटस्पर्स, बर्नले, आणि लिचेस्टर सिटी अश्या प्रमुख संघांचे सामने....

ISL 2017: पुण्याचा बेंगळुरूकडून दारुण पराभव

डिसेंबर 15, 2017

पुणे: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये संभाव्य विजेता अशी गणना होत असलेल्या बेंगळुरु एफसीने गुणतक्त्यात निर्विवाद आघाडी घेतली. एफसी पुणे सिटीविरुद्ध पूर्वार्धातील पिछाडीनंतर दुसऱ्या सत्रात अनुकुल परिस्थितीचा पुरेपूर फायदा....

घरच्या मैदानावर विजय मिळविण्यास पुणे आतूर

डिसेंबर 14, 2017

पुणे: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) एफसी पुणे सिटीची गुरुवारी बेंगळुरु एफसीविरुद्ध लढत होत आहे. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पुण्याने यंदा तीनपैकी दोन सामने गमावले आहेत.....

चॅम्पियन्स लीग ड्राॅ: चेल्सी भिडणार बार्सिलोनाशी तर जुवेंटसचा सामना टोट्टेन्हमसोबत

डिसेंबर 11, 2017

आज युएफा चॅम्पियन्स लीगचा अंतिम १६ संघांचे भवितव्य ठरवणारा ड्राॅ पार पडला. ८ गटातून ८ उपविजेत्या संघांचे उर्वरित गटाच्या विजेत्या संघातील एका संघाबरोबर सामना ठरणार....

La Liga: मेस्सी आणि सुवारेजच्या गोलच्या जोरावर बार्सिलोना ला लीगाच्या गुणतालिकेत अव्वल

डिसेंबर 11, 2017

आज झालेल्या ला लीगाच्या १५व्या आठवड्याच्या शेवटच्या सामन्यात बार्सिलोनाने विल्रारियलचा ०-२ ने पराभव करत पुन्हा एकदा विजयी लय प्राप्त केली. मागील २ लीग सामने ड्राॅ....

ISL 2017: मुंबई सिटीला मिळालेल्या पेनल्टीच्या जोरावर चेन्नईयीनची घोडदौड खंडित

डिसेंबर 10, 2017

मुंबई: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये सलग तीन विजय मिळवलेल्या चेन्नईयीन एफसीची घोडदौड खंडित झाली. मुंबई सिटी एफसीने घरच्या मैदानावर पेनल्टी किकच्या जोरावर महत्वाचा विजय संपादन केला.....

Previous Next