सोमवारी (दि. 13 मार्च) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 कसोटी मालिकेचा अंतिम सामना पार पडला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडलेला हा सामना अनिर्णित झाला. यासह भारतीय संघाने मालिका 2-1ने खिशात घातली. विशेष म्हणजे, मागील चारही बॉर्जर-गावसकर ट्रॉफी मालिकेचे निकाल हे भारताच्याच बाजूने लागले आहेत. चला तर आपण त्यावर एक नजर टाकूयात.
भारत- ऑस्ट्रेलिया संघातील चौथ्या सामन्याचा आढावा
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील चौथ्या कसोटी सामन्यात पाहुण्या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना तब्बल 480 धावा चोपल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघानेही कडवी झुंज दिली. विशेष म्हणजे, भारताने यावेळी आघाडी घेतली. भारताने पहिल्या डावात तब्बल 571 धावा चोपत 91 धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या पाचव्या दिवशी 2 विकेट्स गमावत 168 धावा केल्या. तसेच, 77 धावांची आघाडी घेतली. मात्र, दोन्ही संघांनी सहमती दर्शवत हा सामना अनिर्णित ठरवला. यासह ही मालिका भारताने 2-1ने नावावर केली.
India 🇮🇳 🤝🏻 Australia 🇦🇺
The final Test ends in a draw as #TeamIndia win the Border-Gavaskar series 2-1 🏆#INDvAUS pic.twitter.com/dwwuLhQ1UT
— BCCI (@BCCI) March 13, 2023
भारताचा पराक्रम
विशेष म्हणजे, भारताने खेळलेल्या मागील चार बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिका स्वत:कडेच ठेवल्या आहेत. 2017 साली खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेचा निकाल भारताच्या बाजूने लागला होता. भारताने ही मालिका 2-1ने खिशात घातली होती. 2019ची मालिकाही भारताने 2-1ने नावावर केली होती. त्यानंतर 2021ची बॉर्डर-गावसकर ट्रॉफीही भारताने 2-1नेच आपल्याकडे ठेवली होती. अशात आता 2023ची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकाही भारताने 2-1ने जिंकली.
या चार बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील साम्य म्हणजे, या चारही मालिका भारताने 2-1च्या फरकाने आपल्या नावावर केल्या आहेत. ( take a look on Results of last four BGT series)
मागील चार बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकांचा निकाल-
2017 – भारत 2-1ने विजयी
2019 – भारत 2-1ने विजयी
2021 – भारत 2-1ने विजयी
2023 – भारत 2-1ने विजयी*
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयसीसी पुरस्कार अन् जडेजाच्या मध्ये ‘हा’ इंग्लिश खेळाडू बनला काटा, सलग दुसऱ्यांदा मारली बाजी
VIDEO | केन विलियम्सन ठरला हिरो! शेवटच्या चेंडूवर न्यूझीलंडला विजयी, भारत WTCच्या फायनलमध्ये