इंग्लंड आणि भारत यांच्यात खेळल्या जात असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना हेडिंग्ले मैदानावर सुरु आहे. जिथे भारतीय संघ एक प्रकारे सामना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसऱ्या दिवसाखेर संघाने २ विकेट्सच्या नुकसानावर २१५ धावा केल्या आहेत. अजून त्यांचा इंग्लंडचे आव्हान गाठण्यासाठी १३९ धावा करायच्या आहेत. या कसोटी मालिकेदरम्यान काही विचित्र गोष्टी पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशीही असेच काहीसे घडले.
चक्क एक विमान ‘इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला (ईसीबी) हटवा आणि कसोटी क्रिकेट वाचवा’, अशी मागणी करणारा बॅनर लटकवून हवेत उडताना दिसले. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी चहापानाच्या ब्रेकनंतर हे विमान उडताना दिसले. हा सर्व प्रकार पाहून सोशल मीडिचावर खळबळ उडाली आहे.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने काही दिवसांपूर्वीच नवीनतम स्वरुप, द हंड्रेड लीगची सुरुवात केली आहे. या लीगमुळे देशांतर्गत टूर्नामेंट काउंटी चॅम्पियनशिप २०२१ आणि इंग्लंडचा टी-२० ब्लास्ट मध्यंतरी थांबवावा लागला होता. म्हणून त्यांना टीकेला सामोरे जावे लागत आहे.
अलीकडच्या काळात, केविन पीटरसनसह इंग्लंडच्या अनेक महान खेळाडूंनी क्रिकेटच्या प्रदीर्घ स्वरूपातील खेळाडूंच्या संघर्षाबद्दल आवाज उठवला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “कसोटी क्रिकेटपटूंची ही अवस्था लहान स्वरुपाच्या लीगवर अधिक लक्ष केंद्रित करण्यामुळे झाली आहे आणि काउंटी सामन्यांना कमी महत्त्व दिल्यामुळे हे घडले आहे.” एवढेच नाही तर, या घडीला द हंड्रेडसारख्या नवीन स्वरुपाची गरज आहे का? असे प्रश्न देखील उपस्थित केले गेले आहेत.
१०० चेंडूंची ही स्पर्धा काउंटी चॅम्पियनशिपच्या समांतर खेळली गेली. यामुळे अनेक खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट सोडून द हंड्रेडमध्ये भाग घेतला. चहूबाजूंनी टीका होत असतानाही बोर्डाने ही लीग खेळवण्याचा निर्णय घेतला आणि शतकांपासून चालत आलेल्या काउंटी चॅम्पियनशिप आणि टी-२० ब्लास्ट या स्पर्धा थांबवल्या.
Pictures pic.twitter.com/A5dK25yAQQ
— Ketan | کیتن (@Badka_Bokrait) August 27, 2021
द हंड्रेडच्या ओपनिंग एडिशनला प्रेक्षकांचा भरपूर पाठिंबा मिळाला आहे. ईसीबीने सर्व सामने वेळेवर पूर्ण केले आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांचा भरपूर पाठिंबा होता. ईसीबीने द हंड्रेड लीगचे आयोजन करण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट वेळापत्रक कमी करण्याच्या निर्णयामुळे त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे हेडिंग्ले मैदानावर एका समीक्षकाने बॅनर हवेत उडवून क्रिकेट मंडळाला बरखास्त करण्याची आणि कसोटी क्रिकेट वाचवण्याची मागणी केली असावी.
हेडिंग्ले येथे खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात फक्त ७८ धावांवर सर्वबाद झाला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इंग्लंड संघाने जो रूटच्या शतकी खेळीच्या आधारे ४३२ धावा केल्या आणि भारताला ३५४ धावांचे आव्हान दिले आहे. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने तिसऱ्या दिवसाखेर २ गडी गमावून २१५ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहितच्या विकेटनंतर विराटऐवजी फलंदाजीला आला ‘तो’, पाहून पुजाराही बुचकळ्यात; व्हिडिओ व्हायरल
अद्भुत, अविश्वसनीय! जॉनी बेयरस्टोने घेतला एकहाती अप्रतिम कॅच; पाहा व्हिडिओ
भारीच! इंग्लंडमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा रोहित शर्मा ठरला केवळ तिसराच भारतीय सलामीवीर