India vs Afghanistan 3rd T20I: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात सुपर ओव्हरदरम्यान घेतलेल्या निर्णयावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. रोहित शर्माने स्वत:हून रिटायर्ड बाद झाला होता. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
खरं तर, पहिल्या सुपर ओव्हरमध्ये जेव्हा भारतीय संघाला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी दोन धावांची गरज होती, तेव्हा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) मैदानाबाहेर गेला होता. त्याच्या जागी रिंकू सिंग (Rinku Singh) मैदानात आला. रिंकू सिंगला वेगवान धावा करता याव्यात यासाठी रोहित शर्माने हा निर्णय घेतला. मात्र, तसे झाले नाही आणि अखेरच्या चेंडूवर भारतीय संघाला केवळ एक धाव मिळाली आणि सामना पुन्हा एकदा बरोबरीत सुटला. यानंतर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला. (taking himself out was ashwin level thinking says rahul dravid on rohit s super over swap)
सामन्यानंतर पत्रकार परिषदेत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी रोहित शर्माच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी रोहित शर्माची तुलना अश्विनशी केली, कारण अश्विनने एकदा आयपीएलमध्ये अशाच पद्धतीने स्वतःला बाद केले होते. द्रविड म्हणाला, “स्वत:ला रिटायर्ड बाद करणे ही अश्विनसारख्याची विचारसरणी आहे.”
भारतीय संघाने तिसर्या टी-20 सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव करत तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली. बेंगलोर येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने कर्णधार रोहित शर्माच्या शतकाच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 4 विकेट्स गमावून 212 धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्ताननेही चांगली फलंदाजी करत 212 धावा केल्या आणि सामना बरोबरीत सुटला. यानंतर सुपर ओव्हर झाली पण तीही बरोबरीतच राहिली. यानंतर आणखी एक सुपर ओव्हर झाली आणि त्यानंतर भारतीय संघाचा विजय झाला. (That was Ashwin’s thinking Coach Rahul Dravid’s eye-catching statement on Rohit’s retirement)
हेही वाचा
IND vs AFG: विराट बेंगलोरमध्ये बनला सुपरमॅन, करीम जनातच्या षटकाराचे केले एका धावेत रूपांतर
IND vs AFG: रोहितच्या नावावर मोठा विश्वविक्रम;असा कारणामा करणारा ठरला जगातील पहिला फलंदाज