---Advertisement---

क्रूरतेची परिसीमा! तालिबान्यांनी महिला व्हॉलीबॉलपटूचा केला शिरच्छेद

On: गुरूवार, ऑक्टोबर 21, 2021 11:13 AM
---Advertisement---

गेल्या काही दिवसांपूर्वी तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर पुन्हा सत्ता मिळवून दहशत निर्माण केली आहे. गेल्या काही महिन्यात यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. परंतु आता तालिबान्यांनी अफगानिस्तानच्या ज्युनियर राष्ट्रीय व्हॉलीबॉल महिला संघातील खेळाडूसोबत जे काही केले आहे, ते जाणून तुमचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही.

तालिबानच्या काही मुलांनी अफगानिस्तानच्या ज्युनियर राष्ट्रीय व्हॉलीबॉल महिला संघातील खेळाडूचा शिरच्छेद करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महिला खेळाडूचे नाव महजबीन हकिबी असे होते. अफगाणिस्थानच्या ज्युनियर राष्ट्रीय व्हॉलीबॉल महिला संघाच्या प्रशिक्षकांनी याबाबत खुलासा करत म्हटले की , “एक महिन्यापूर्वी जेव्हा ही घटना घडली त्यावेळी हे कोणालाच माहित नव्हते. कारण, त्यांनी खेळाडूच्या कुटुंबातील सदस्यांना धमकी दिली होती. त्यांनी धमकी देत म्हटले होते की, जर याबाबत कोणी काही सांगितले तर त्याची देखील देखील हत्या केली जाईल.”

स्टार खेळाडूंपैकी एक होती महजबीन

महजबीन एक उत्तम व्हॉलीबॉलपटू होती. तसेच ती आपल्या क्लबमधील एक स्टार खेळाडू होती. काही दिवसांपूर्वी तिचा शिरच्छेद केल्यानंतर तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यानंतर सर्वांना या घटनेची माहिती मिळाली होती.

महजबीन ही हजारा जातीय समूहातील होती. अफगाणिस्तानमध्ये हजारा अल्पसंख्याक आहेत आणि तालिबान त्यांचाही तिरस्कार करतात. तसेच तालिबान सत्तेत आल्यापासून त्यांनी महिलांवर काही नियम आणि अटी लागू केल्या आहेत. त्यांना बुरखा घालावा लागतो. तसेच बाहेर येण्यास आणि खेळण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. हेच कारण आहे की, बहुतांश महिलांनी अफगाणिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला होता. काही महिला व्हॉलीबॉल खेळाडूंना देश सोडण्यास यश आले तर काही खेळाडू अजुनही तिथेच आहेत. तर फुटबॉलपटूंनी देखील देश सोडण्याचा निर्णय घेतला होता. काही खेळाडूंना पोर्तुगालने आसरा दिला. तर काही खेळाडू इतर देशांमध्ये स्थलांतरित झाले. परंतु महजबीन असे करण्यास अपयशी ठरली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---