---Advertisement---

भारत वि. अफगाणिस्तान सामन्यास तालिबानी नेत्याने लावली हजेरी, व्हिडिओ पोस्ट करत दिला संदेश

On: गुरूवार, नोव्हेंबर 4, 2021 1:01 PM
---Advertisement---

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा यूएई आणि ओमानमध्ये सुरू आहे. ही स्पर्धा भारतात पार पडणार होती. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा यूएई आणि ओमानमध्ये खेळवली जात आहे. दरम्यान बुधवारी (३ नोव्हेंबर) भारत विरुद्ध अफगानिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात तालिबानी नेत्यांनी एंट्री केल्याचे पाहायला मिळाले, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

बुधवारी (३ नोव्हेंबर) अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर भारत विरुद्ध अफगानिस्तान या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना झाला. हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा होता. कारण गेल्या २ सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. भारत आणि अफगानिस्तान संघाविरुद्ध झालेल्या रोमांचक सामन्यात अफगानिस्तान संघाला समर्थन करण्यासाठी तालिबानचे मुख्य नेता आणि अधिकारी देखील पोहोचले होते. एका अधिकाऱ्याने त्यांचा व्हिडिओ शेअर केला, जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ही बातमी पाकिस्तानच्या माध्यमांनी देखील दाखवली आहे.

या निर्णायक सामन्यात अफगानिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. कारण भारतीय फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. भारतीय संघाकडून रोहित शर्माने ४७ चेंडूंमध्ये ७४ धावांची खेळी केली. तर केएल राहुलने ४८ चेंडूंमध्ये ६९ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला २० षटक अखेर २ बाद २१० धावा केल्या होत्या.

या धावांचा पाठलाग करताना अफगानिस्तान संघाकडून करून जनतने २२ चेंडूंमध्ये ४२ धावांची खेळी केली. तर मोहम्मद नबीने ३२ चेंडूंमध्ये ३५ धावांची खेळी केली.परंतु अफगानिस्तान संघाला दिलेले आव्हान गाठता आले नाही. अफगानिस्तान संघाला २० षटक अखेर ७ बाद १४४ धावा करण्यात यश आले होते. हा सामना भारतीय संघाने ६६ धावांनी आपल्या नावावर केला.

महत्त्वाच्या बातम्या-

हीच आहे ‘हिटमॅन’ची ताकद! रोहितचा ढासू षटकार, चेंडू जाऊन पडला थेट डगआऊटमधील विराटपाशी

“दोन सामने हरलो, याचा अर्थ असा नाही की आम्ही खेळाडू वाईट आहोत किंवा आमचा लीडर वाईट आहे”

अफगानिस्तान विरुद्धच्या सामन्यात ‘मिस्ट्री स्पिनर’ चक्रवर्तीला डच्चू मिळण्यामागे ‘हे’ होते प्रमुख कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---