सध्या देशांतर्गत क्रिकेटमधील महत्वाची विजय हजारे ट्रॉफी खेळली जात आहे. शुक्रवारी (1 डिसेंबर) विजय हजारे ट्रॉफीमध्ये पंजाब आणि तामिळनाडू संघ आमने सामने होते. मुंबईत खेळल्या गेलेल्या या सामन्यात विजयासाठी तामिळनाडूपुढे 252 धावांचे लक्ष्य होते. पण तामिळनाडूचे फलंदाज एकापाठोपाट एक विकेट्स गमावताना दिसले. एकट्या दिनेश कार्तिक याने पंजाबपुढे आव्हान उभे केले.
भारतीय संघाचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्दिक (Dinesh Karthik) सध्या राष्ट्रीय संघाचा भाग नाहीये. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर 2022 मध्ये म्हणजे जवळपास एक वर्षापूर्वी खेळला होता. असे असले तरी, कार्दिकचा फॉर्म अजूनही जबरदस्त आहे. त्याने शुक्रवारी (1 डिसेंबर) मुंबईत तामिळनाडू संघासाठी 93* धावांची झंजावाती खेळी केली. यासाठी त्याने एकूण 82 चेंडू खेळले असून 13 चौकार आणि 4 षटकार मारले. 113.41च्या स्ट्राईक रेटने या धावा कार्तिक करू शकला. असे असले तरी, तामिळनाडू संघाला कर्तिकची ही खेळी विजय मिळवून देऊ शकली नाही.
TAKE A BOW, DINESH KARTHIK…!!!!
93 (82) with 13 fours and 4 sixes – Tamil Nadu were 95/7 at one stage chasing 252, captain DK came to the rescue. What an innings by Karthik. pic.twitter.com/MZh3cTfs8s
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 1, 2023
उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर तामिळनाडूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. संघाचा हा निर्णय एका अर्थाने योग्य ठरला. कारण प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघ 45.2 षटकांमध्ये 251 धावा करून सर्वबाद झाला. प्रभसिमरन सिंग (58) आणि कर्णधार मनदीप सिंग (68) यांनी पंजाब संघासाठी अर्धशतके केली. दुसरीकडे तामिळनाडूसाठी बाबा अपराजीथ याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. साई किशोर आणि वरून चक्रवर्थी यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. साई सुदर्शन, टी नटराजन आणि संदीप वारियर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात तामिळनाडूसाठी 252 धावांचे हे लक्ष्य मोठे वाटत नव्हते. तामिळनाडूचे पहिले पाच फलंदाज स्वस्तात बाद झाले. सहाव्या क्रमांकावर आलेल्या कार्तिकने मात्र, 93 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. कार्तिकची ही खेळी अप्रतिम होती. पण त्याला संघातील इतर एखादा फलंदाज अपेक्षित साथ देऊ शकला नाही. परिणामी तामिळनाडू संघ 34.2 षटकांमध्ये 175 धावांवर सर्वबाद झाला. पंजाबच्या विजयात सिद्दार्थ कौल याचे योगदान सर्वात महत्वाचे ठरले. कौलने 8 षटकात 50 धावा खर्च करून सर्वाधिक 5 विकेट्स नावावर केल्या. प्रीत दत्ता याने 3, तर मयांक मारकंडे याने 2 विकेट्स घेतल्या.
महत्वाच्या बातम्या –
‘इरफानला 5 वर्षे केलं डेट, गंभीरही सारखाच करायचा…’, शमीला प्रपोज करणाऱ्या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
‘त्याला लॉलीपॉप दिलंय…’, चहलला टी20 ऐवजी वनडे संघात जागा मिळताच दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया