IPLक्रिकेटटॉप बातम्या

IPL 2024पूर्वी घोंगावलं RCBच्या पठ्ठ्याचं वादळ! विजय हजारे ट्रॉफीत 81 बॉलमध्ये पाडला ‘एवढ्या’ धावांचा पाऊस

सध्या भारतात देशांतर्गत क्रिकेट हंगाम सुरू आहे. यातील विजय हजारे ट्रॉफी 2023 स्पर्धेत अनेक युवा भारतीय खेळाडू आपला दम दाखवताना दिसत आहेत. याच स्पर्धेत आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा फलंदाज सुयश प्रभुदेसाई याने जबरदस्त फलंदाजी केली आहे. सुयशने नागालँडविरुद्ध शानदार शतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अशात आयपीएल 2024 स्पर्धेपूर्वी आरसीबी संघासाठी ही आनंदाची बातमी आहे.

विजय हजारे ट्रॉफी 2023 (Vijay Hazare Trophy 2023) स्पर्धेच्या राऊंड 5मधील इ गटातील सामना गोवा विरुद्ध नागालँड संघात खेळला गेला. यावेळी सुयश प्रभुदेसाई (Suyash Prabhudessai) याने गोवाकडून खेळताना 81 चेंडूत 132 धावांची नाबाद तडाखेबंद शतकी खेळी केली. त्याने नागालँडच्या गोलंदाजांची धुलाई करत 6 षटकार आणि 9 चौकारांचा पाऊस पाडला. सुयश आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेतही खेळला होता, पण त्याला त्यावेळी आपली छाप सोडण्यात अपयश आले होते. मात्र, त्याने छोट्या-छोट्या खेळीने दाखवून दिले होते की, त्याला संधी दिली, तर तो मोठी खेळीही करू शकतो.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये सुयश असेच काहीसे करताना दिसत आहे. मात्र, आयपीएल 2024 (IPL 2024) स्पर्धेत तो आरसीबी (RCB) संघासाठी महत्त्वाचा खेळाडू बनू शकतो. कारण, या धमाकेदार फॉर्ममध्ये तो दिनेश कार्तिक याच्यासोबत सामना फिनिश करण्याची ताकद ठेवतो. मात्र, आयपीएल सुरू होण्यासाठी अजून काही महिने शिल्लक आहेत, पण आरसीबीचे चाहते ही प्रार्थना करत असतील की, सुयश त्याचा हा फॉर्म पुढेही असाच कायम ठेवेल. जेणेकरून, तो आरसीबी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलू शकेल.

दुसरीकडे, या सामन्याविषयी बोलायचं झालं, तर सुयश आणि स्नेहल कौथनकर यांच्या शतकाच्या जोरावर गोवाने निर्धारित 50 षटकात 6 विकेट्स गमावत 383 धावा केल्या होत्या. नागालँडसाठी गोलंदाजीत चोपिसे होपोंगक्यू याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना नागालँडने सुरुवातीच्या 7 षटकात 2 विकेट्स गमावल्या होत्या. पुढे त्यांनी नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. त्यांना 39.1 षटकात सर्व विकेट्स गमावत फक्त 151 धावाच करता आल्या. अशाप्रकारे गोवाने हा सामना 232 धावांनी जिंकला. (rcb cricketer suyash prabhudessai scored 132 from 81 balls against england in vijay hazare trophy 2023)

हेही वाचा-
‘इरफानला 5 वर्षे केलं डेट, गंभीरही सारखाच करायचा…’, शमीला प्रपोज करणाऱ्या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
‘त्याला लॉलीपॉप दिलंय…’, चहलला टी20 ऐवजी वनडे संघात जागा मिळताच दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया

Related Articles