---Advertisement---

प्रो कबड्डी २०२१: तमिळ थलायवाजपुढे यूपी योद्धांची शरणागती, ६ अंकांच्या फरकाने सामन्यात मारली बाजी

On: मंगळवार, जानेवारी 4, 2022 9:37 PM
UP vs Chennai
---Advertisement---

प्रो कबड्डी लीग २०२१ला काही दिवसांपूर्वीच धमाक्यात सुरुवात झाली आहे. प्रो कबड्डीचा यंदाचा हा ८ वा हंगाम आहे. हंगामाच्या चौदाव्या दिवशीचा (०४ जानेवारी) दुसरा सामना ‘यूपी योद्धा’ आणि ‘तमिळ थलायवाज’ संघात झाला.

या हंगामात आतापर्यंत प्रत्येकी १ विजय मिळवलेले हे संघ आपल्या दुसऱ्या विजयासाठी झगडताना दिसले. या सामन्यातील पहिल्या हाफमध्ये चेन्नई संघाने दमदार खेळ दाखवत २१-१० ने मोठी आघाडी घेतली होती. पुढे यूपीने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते चेन्नईच्या मोठ्या आघाडीला पार करू शकले नाहीत. परिणामी ६ अंकांच्या फरकाने म्हणजेच ३९-३३ ने चेन्नईने हा सामना खिशात घातला. हा त्यांचा हंगामातील दुसरा विजय होता.

https://twitter.com/KhelNow/status/1478397964565553160?s=20

पहिला सामना सुटला बरोबरीत

तत्पूर्वी हरियाणा आणि मुंबई यांच्यात झालेल्या पहिल्या सामन्यात पहिल्या हाफमध्ये हरियाणा मुंबईपेक्षा २ अंकांनी अर्थात १२-१० ने आघाडीवर होते. मात्र पुढे मुंबईच्या खेळाडूंनीही सामन्यात जोरदार पुनरागमन केले आणि सामन्याअंती २४-२४ ने हरियाणाशी बरोबरी करण्यात यश मिळवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

SAvsIND, 2nd Test: सलामीवीरांनंतर पुजारा-रहाणेने सावरला डाव, दुसऱ्या दिवसाखेर भारताकडे ५८ धावांची आघाडी

प्रो कबड्डी २०२१: ‘यू मुंबा’ने दाखवला दम, दमदार पुनरागमनासह ‘हरियाणा स्टिलर्स’ला गाठत सामना केला टाय

कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन! पंतने पकडलेल्या झेलवरून पेटला विवाद, यष्टीरक्षकाने चिटिंग केल्याची अनेकांना शंका

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---