सोमवार रोजी (२२ नोव्हेंबर) दिल्ली येथे तमिळनाडू विरुद्ध कर्नाटक यांच्यामध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२१ चा अंतिम सामना पार पडला. या महामुकाबल्यात प्रथम फलंदाजी करताना कर्नाटकने २० षटकअखेर ७ बाद १५१ धावा केल्या. प्रत्युत्तरात तमिळनाडू संघाने शेवटच्या चेंडूवर ४ विकेट्स राखून थरारक विजय मिळवला. तमिळनाडूकडून शेवटच्या चेंडूवर विजयी षटकात खेचत शाहरुख खानने संघाला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे जेतेपद जिंकून दिले.
कर्नाटकच्या १५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना २९ धावांवरच तमिळनाडूला पहिला धक्का बसला होता. सलामीवीर हरी निशांतच्या रुपात (२३ धावा) संघाने पहिली विकेट गमावली होती. मात्र निशांतच्या विकेटनंतर दुसरा सलामीवीर नारायन जगदीशनने संघाचा डाव सावरला. त्याने तमिळनाडूकडून ४६ चेंडूंमध्ये सर्वाधिक ४१ धावा फटकावल्या. परंतु १६ व्या षटकात जगदीशनही झेलबाद झाला.
या २ सलामीवीरांव्यतिरिक्त तमिळनाडूच्या इतर फलंदाजांना विशेष खेळी करता आली नाही. त्यामुळे तमिळनाडूपुढील आव्हान कठीण बनले होते.
संघाला २० व्या षटकात विजयासाठी १६ धावांची गरज होती. यावेळी साई किशोर आणि शाहरुख खान फलंदाजी करत होते. या षटकातील पहिल्या चेंडूवर स्ट्राईकवर असलेल्या साई किशोरने खणखणीत चौकार खेचत संघाला थोडाफार दिला होता. पुढील ४ चेंडूवर साई किशोर आणि शाहरुख खानने १-२ धावा करत आव्हानाच्या नजीक पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अखेरच्या चेंडूवर तमिळनाडूला विजयासाठी केवळ ५ धावा हव्या होत्या. यावेळी स्ट्राईकवर असलेल्या विस्फोटक फलंदाज शाहरुखने आक्रमक पवित्रा घेतला आणि चेंडूला जोराने हवेत टोलवत षटकारासाठी पाठवले.
त्याच्या या भन्नाट शॉटमुळे तमिळनाडूने तिसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे.
https://twitter.com/BCCIdomestic/status/1462724664195633152?s=20
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना कर्नाटकडून मधल्या फळीतील फलंदाज अभिनव मनोहर याने सर्वाधिक ४६ धावा केल्या होत्या. ३७ चेंडूंमध्ये २ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने त्याने या धावा उभारल्या होत्या. तसेच प्रविण दुबेनेही ३३ धावांचे योगदान दिले होते. परिणामी कर्नाटकनला २० षटकअखेर ७ बाद १५१ धावा करता आल्या होत्या.
तमिळनाडूकडून साई किशोरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या होत्या. १५ चेंडूंमध्ये नाबाद ३३ धावा चोपणाऱ्या शाहरुखला या सामन्यात सामानावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ पाच कारणांमुळे न्यूझीलंड संघ भारतासमोर झुकला, सलामीवीरांनी पार पाडली महत्वाची भूमिका
लेकाची काळजी! शोएब मलिकची मुलाची प्रकृती बिघडल्यामुळे टी२० मालिकेतून तडकाफडकी माघार






