बांगलादेश क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वेच्या (ZIMvsBAN) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात झिम्बाब्वे आणि बांगलादेश यांच्यात टी२० मालिका पार पडली आहे. तीन सामन्यांची ही मालिका यजमान संघाने २-१ अशी जिंकली आहे. तर आता तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू झाली आहे. त्यातील पहिला वनडे सामना हरारे येथे खेळला जात आहे. यामध्ये बांगलादेशचा कर्णधार तमीम इक्बालने मोठा पराक्रम केला आहे.
तमीम इक्बाल (Tamim Iqbal) याने या सामन्यात ८८ चेंडूत ६२ धावा केल्या आहेत. याचवेळी तो वनडे क्रिकेटमध्ये ८००० धावा पूर्ण करणारा पहिलाच बांगलादेशचा खेळाडू ठरला आहे. तसेच वनडे क्रिकेटच्या इतिहासात तो अशी कामगिरी करणारा नववा सलामीवीर ठरला आहे. या सामन्यात ५७ धावांची खेळी करताच त्याने या विक्रमाला गवसणी घातली आहे. यादरम्यान त्याने त्याच्या वनडे कारकिर्दीतील ५४वे अर्धशतकही पूर्ण केले आहे. त्याचबरोबर तो वनडेच्या इतिहासात ८००० धावा पूर्ण करणारा तो ३३वा खेळाडू ठरला आहे.
मागील काही सामन्यांमध्ये तमीम जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला आहे. नुकत्याच वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात त्याने वनडे मालिकेत ५८.५०च्या सरासरीने ११७ धावा केल्या होत्या. तीन सामन्यांची ही मालिका बांगलादेशने ३-० अशी जिंकली. या मालिकेत त्याने उत्तम कामगिरी केल्याने त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाल होता.
https://twitter.com/BCBtigers/status/1555479396806696961?s=20&t=lvIZJv7shQdWt2Mq5zzivw
बांगलादेशच्या या डाव्या हाताच्या खेळाडूने २००७मध्ये वनडे पदार्पण केले. तेव्हापासूनच तो संघाचा महत्वाचा खेळाडू बनला आहे. तो तिन्ही प्रकारचे क्रिकेट खेळत असून वनडेमध्ये त्याची कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे. तो वनडेमध्ये बांगलादेशकडून सर्वप्रथम ५०००, ६०००, ७००० आणि ८००० धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
वनडे क्रिकेटचे भविष्य धोक्यात आले आहे, अशा चर्चा होत असताना तमीमने त्याचेही मत व्यक्त केले आहे. त्याने म्हटले, वनडे क्रिकेट हे महत्वाचे असून आयसीसीनेही असेच म्हटले आहे. चाहत्यांनाही हा प्रकार आवडतो. आयसीसीच्या स्पर्धा पाहिल्या तर टी२० विश्वचषक तेवढे महत्वाचे नाही, मात्र वनडे हा क्रिकेटचा प्रकार सर्वाधिक महत्वाचा आहे.
तमीमने वनडे क्रिकेटमध्ये १४ शतकेही केली आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय टी२० मध्येही त्याने एक शतक झळकावले आहे. कसोटीमध्ये १० शतके केली आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पीकेएल ऑक्शनचे बंपर ओपनिंग, पहिल्याच खेळाडूच्या खिशात तब्बल ‘इतके लाख’
प्रो कबड्डी लीगच्या ९व्या हंगामातील पहिला कोट्याधीश मिळाला! नाव फझल अत्राचली
कसोटी क्रिकेटमुळे भारताचे दोन ‘रवी’ एकमेकांशी भिडले, वाचा काय आहे प्रकरण






