जानेवारी २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ‘प्लेअर ऑफ द मंथ’ अर्थात महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू या नव्या पुरस्काराची घोषणा केली होती. त्यानुसार प्रत्येक महिन्यात निवडक अशा पुरुष आणि महिला क्रिकेटपटूला हा मानाचा पुरस्कार देण्यात येतो. आता फेब्रुवारी या महिन्यातील महिला ‘प्लेअर ऑफ द मंथ’ चा पुरस्कार इंग्लंड संघाची यष्टीरक्षक फलंदाज तामसिन ब्यूमॉन्ट हिला मिळाला आहे.
फेब्रुवारी महिन्यात न्यूझीलंड महिला संघ विरुद्ध इंग्लंड महिला संघ यांच्यात ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवण्यात आली होती. या मालिकेतील तिन्ही सामन्यात संघाचे प्रतिनिधित्त्व करताना तामसिन ब्यूमॉन्ट हिने २३१ च्या सरासरीने फलंदाजी केली आहे. यासह नाबाद ८८ धावांच्या सर्वोच्च खेळीसह तिने एकूण २३१ धावा चोपल्या आहेत. दरम्यान तिन्ही सामन्यात तिने धावांची पन्नाशी पार केली होती.
तामसिन ब्यूमॉन्टच्या या योगदानामुळे इंग्लंडने २-१ ने न्यूझीलंडला वनडे मालिकेत पराभूत केले. तिच्या या लक्षणीय कामगिरीला पाहता तिला फेब्रुवारी महिन्यातील ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार देण्यात आला आहे.
Three ODIs in February. 231 runs. 231 average 🤯
She's the new number 1️⃣ women's ODI batter and now @Tammy_Beaumont has another individual accolade to her name 🌟
Congratulations, Tammy! 👏 pic.twitter.com/770bgYCr7v
— ICC (@ICC) March 9, 2021
अशा पद्धतीने दिले जातील पुरस्कार
या पुरस्काराचे विजेते निवडण्यासाठी प्रत्येक महिन्यात चाहत्यांनाही आपले मत देता येणार आहे. माजी खेळाडू, प्रसारक आणि जगभरातील पत्रकार यांचा समावेश असणारी स्वतंत्र आयसीसी व्होटिंग अकादमी चाहत्यांसह आयसीसीच्या महिन्यातील सर्वोत्तम पुरुष आणि महिला खेळाडूची निवड करण्यासाठी एकत्र येईल.
आयसीसी पुरस्कार नामांकन समितीमार्फत खेळाडूंची मैदानातील कामगिरी आणि त्या महिन्याच्या कालावधीतील एकूण कामगिरीवर आधारित प्रत्येक गटातील तीन उमेदवारांची नामांकनासाठी निवड केली जाईल. त्यानंतर या तीन उमेदवारांसाठी आयसीसी व्होटिंग अकादमी आणि चाहते मतदान करतील.
व्होटिंग अकादमी आपले मत ईमेलद्वारे सुपुर्त करेल. त्यानंतर, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी आयसीसीकडे नोंदणी करुन चाहते आयसीसीच्या वेबसाइटद्वारे मतदान करू शकतील. पुरस्काराचे विजेते ठरवण्यासाठी व्होटिंग अकादमीच्या मतांना ९० टक्के तर चाहत्यांच्या मतांना १० टक्के प्राधान्य असेल. त्यानंतर आयसीसीच्या डिजिटल चॅनेलवर महिन्याच्या प्रत्येक दुसर्या सोमवारी विजेत्यांची घोषणा केली जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! ‘प्लेअर ऑफ द मंथ’चा पुरस्कार यंदा ‘या’ क्रिकेटरच्या पारड्यात
“रिषभ पंत एकटाच विरोधी संघाला पुरून उरेल, तो एक मॅचविनर खेळाडू आहे”
Video: कोरोना चाचणी करतेवेळी सचिन तेंडूलकरला ‘हे’ काय झालं, डॉक्टरही गेले घाबरुन