पुणे। फर्ग्युसन कॉलेज आणि नंदन बाळ टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या डी.ई.एस. फर्ग्युसन कॉलेज चॅम्पियनशीप सिरीज 18वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात तनिष्क जाधव, साहिल तांबट, निशित रहाणे, अंशुल सातव याने तर, मुलींच्या गटात अस्मि आडकर, प्रतिष्ठा सैनी, हिया मेहता या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत सहाव्या मानांकित तनिष्क जाधव याने चौथ्या मानांकित अनमोल नागपुरेचा 6-1, 6-3 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. सातव्या मानांकित निशीत रहाणे याने सिद्धार्थ मराठेचा 6-4, 6-2 असा तर, दुसऱ्या मानांकित साहिल तांबटने पाचव्या मानांकित आर्यन कोटस्थानेचा 6-1, 6-3 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. संघर्षपूर्ण लढतीत अंशुल सातव याने ओजस दबसचा टायब्रेकमध्ये 3-6, 7-6(6), 6-0 असा पराभव करून आगेकूच केली.
मुलींच्या गटात तेलंगणाच्या हिया मेहताने काल अव्वल मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळवणाऱ्या दुर्गा बिराजदारचे आव्हान 6-3, 6-2 असे मोडीत काढले. सहाव्या मानांकित अस्मि आडकर हिने प्रिशा शिंदेला 6-2, 6-0 असे पराभूत केले. प्रतिष्ठा सैनीने श्रुती नानजकरला 6-3, 6-4 असे नमविले.
निकाल: मुख्य ड्रॉ(उपांत्यपूर्व फेरी): मुले:
तनिष्क जाधव(महा)[6]वि.वि.अनमोल नागपुरे(महा)[4] 6-1, 6-3;
निशीत रहाणे(महा)[7] वि.वि.सिद्धार्थ मराठे(महा)6-4, 6-2;
अंशुल सातव(महा)वि.वि.ओजस दबस(महा) 3-6, 7-6(6), 6-0;
साहिल तांबट(महा)[2] वि.वि.आर्यन कोटस्थाने(महा)[5]6-1, 6-3;
मुली:
हिया मेहता(तेलंगणा)वि.वि.दुर्गा बिराजदार(महा)6-3, 6-2;
प्रतिष्ठा सैनी(महा)वि.वि.श्रुती नानजकर(महा)6-3, 6-4;
अस्मि आडकर(महा)[6] वि.वि.प्रिशा शिंदे(महा)6-2, 6-0;
अग्निमित्रा भट्टाचार्य(महा)[4]वि.वि.रितिका मोरे(महा)4-6, 6-0, 6-1;
दुहेरी गट: मुले:
जय दिक्षीत/निशित रहाणे वि.वि.अनिश रांजळकर/साहिल तांबट[1] 6-7(1), 6-4, 10-4;
सिद्धार्थ मराठे/अंशुल सातव वि.वि.प्रणव कोरडे/सार्थ बनसोडे[4] 6-4, 7-5;
अर्णव कोकणे/आर्यन कोटस्थाने[3] वि.वि.वेद ठाकूर/मनन चितानिया 7-5, 6-3;
तनिष्क जाधव/अनमोल नागपुरे[2] वि.वि.अर्जुन अभ्यंकर/संप्रित शर्मा 7-6(4), 4-6, 10-5;
मुली:
धन्वी काळे/अग्निमित्रा भट्टाचार्या[1] वि.वि.स्नेहा गजभर/भावना अगरवाल 6-2, 6-1;
रजिथा राजेश/प्रतिष्ठा सैनी[4] वि.वि.ईश्वरी मार्कंडे/दुर्गा बिराजदार 7-5, 6-0;
मृण्मयी जोशी/श्रुती नानजकर[2] वि.वि.भक्ती ताजने/रितिका मोरे 7-6(5), 6-3.
महत्त्वाच्या बातम्या –
‘गप्प बस वडा पाव, एक मॅच तर जिंकत नाही तुझ्याकडून’, चाहते का करतायेत रोहित शर्माला ट्रोल?
‘रिषभ पंत बनू शकतो कसोटी कर्णधार’, भारतीय संघाला विश्वविजेता बनवणाऱ्या दिग्गज खेळाडूचे वक्तव्य
मूर्ती लहान, कीर्ती महान! आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात ‘अशी’ कामगिरी करणारा उमरान बनला दुसरा खेळाडू