भारतीय संघाचा माजी दिग्गज अष्टपैलू युवराज सिंगने भविष्यातील भारतीय संघाचा कसोटी कर्णधार म्हणून यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला समर्थन दिले. दरम्यान काही काळापूर्वी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत पराभूत झाला. या पराभवानंतर विराटने कसोटी कर्णधारपदाजी जबाबदारी सोडली आणि रोहित शर्माने ती सांभाळली आहे.
एका चॅनेलशी बोलताना युवराज सिंग (Yuvraj Singh) कसोटी कर्णधारपदाविषयी मत व्यक्त केले. युवराजच्या मते संघाला नवीन कर्णधार तयार करावा लागणार आहे. माही (एमएस धोनी) जसा सुरुवातीला कुठेच नव्हता, पण कर्णधार बनला. त्याला बनवले गेले, होय ना! नंतर तो विकसित झाला. यष्टीरक्षक नेहमीच एक योग्य विचार करणारा असतो. त्याच्याकडे नेमहीच जमीनीवरची सर्वात चांगली नजर असते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
युवराज पुढे म्हणाला की, “मी त्या वयाच अपरिपक्व होतो, विराट जेव्हा त्या वयात कर्णधार होता, तेव्हा अपरिपक्व होता, पण तो (पंत) काळानुसार परिपक्व होत आहे. सपोर्ट स्टाफ याविषयी काय विचार करतो मला माहिती नाहीये, पण मला वाटते की, तो कसोटी संघाचे नेतृत्व करण्यासाठी योग्य व्यक्ती आहे.” युवराज यावेळी असेही म्हणाला की, “पंतने एका कसोटी क्रिकेटपटूच्या रूपात स्वतःला स्थापित केले आहे. अशात तो भविष्यात भारतीय संघाचा कर्णधार बनू शकतो. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये शतक देखील ठोकले आहे.”
रिषभ पंतकडे आयपीएलमध्ये संघाचे नेतृत्व करण्याचा चांगला अनुभव आहे. तो दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करतो आणि कर्णधाराच्या रूपातील त्याचे काम चांगले राहिले आहे. मागच्या वर्षी रिषभ पंतच्याच नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सने स्पर्धेची प्लेऑफ फेरी गाठली. चालू हंगामातील काही सामन्यांमध्ये देएखील दिल्लीचे प्रदर्शन चांगले राहिले आहे, पण त्यांना अपेक्षेप्रमाणे प्रदर्शन करता आले नाहीये.
दरम्यान, सध्या रोहित शर्मा जरी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व करत असला, तर त्याचे वय चिंतेचा विषय आहे. रोहितने वय ३४ वर्ष आहे आणि तो पुढे अधिक काळापर्यंत खेळू शकत नाही. अशात तो कसोटी संघाच्या कर्णधारपदी देखील जास्त काळ राहू शकणार नाही. अशात संघाला एक नवीन आणि युवा कर्णधाराची आवश्यकता आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हैदराबादच्या फलंदाजी फळीत जोकर’, विलियम्सन ५ धावांवर बोल्ड झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्स व्हायरल
माजी भारतीय प्रशिक्षकाचा दावा; म्हणे, पंजाब किंग्जचा ‘हा’ युवा गोलंदाज टीम इंडियात बनवणार जागा