गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघात आयपीएल २०२२चा ४०वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअममध्ये पार पडला. बुधवारी (दि. २७ एप्रिल) पार पडलेल्या या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद संघाने ७ षटकातच २ विकेट्स गमावत ५९ धावा चोपल्या होत्या. यादरम्यान हैदराबाद संघाचा कर्णधार केन विलियम्सन मोठी खेळी न करताच तंबूत परतला.
केन विलियम्सन झाला त्रिफळाचीत
झालं असं की, गुजरात (Gujarat Titans) संघाविरुद्ध हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाची सुरुवात खूपच खराब झाली होती. असे असले, तरीही हैदराबादकडून त्यांचे सलामीवीर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) संघाला शानदार सुरुवात करून देण्यासाठी गुजरातच्या गोलंदाजांवर तुटून पडला. दुसरीकडे, याच सामन्यात तिसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर मोहम्मद शमीने (Mohammed Shami) कर्णधार केन विलियम्सनला (Kane Williamson) ५ धावांवर त्रिफळाचीत केले.
विशेष म्हणजे, यावेळी शमीने ताशी १३६.४ किमी वेगाने चेंडू फेकला होता. हा चेंडू ऑफ स्टंपच्या दिशेने आत आला आणि विलियम्सनला चेंडू ऑन ड्राईव्हच्या दिशेने मारायचा होता. मात्र, बॅट आणि पॅडमधील गॅपमधून चेंडू थेट स्टंपवर जाऊन लागला. यामुळे हैदराबाद संघाने आपली पहिली विकेट गमावली. दुसरीकडे, केन विलियम्सन बाद झाल्यानंतर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
केन विलियम्सन बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पूर आला आहे. चला पाहूया-
एका चाहत्याने ट्विटरवर मीम शेअर करत लिहिले आहे की, “सनरायझर्सच्या फलंदाजी फळीत केन विलियम्सन.”
https://twitter.com/RoshanKrRaii/status/1519344249661239296
दुसऱ्या एका चाहत्याने विलियम्सनला सल्ला देत लिहिले की, “केन विलियम्सनने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली पाहिजे. तो तिथेच चांगला खेळतो. राहुल त्रिपाठी आणि अभिषेक शर्मा यांनी सलामीला फलंदाजी केली पाहिजे.”
Kane Williamson should bat at no 3, this is where he is best at.
Rahul Tripathi & Abhishek Sharma should open.@SunRisers#IPL2022— Abhimanyu (@abhimanyusrt) April 27, 2022
Shami owns Kane Luckliamson but couldn't dismiss him quick when it mattered the most 3 times ☹️
— Adish Shetty (@36__NotAllOut) April 27, 2022
I actually praised Kane😔for his captaincy
— Rishabh (@Rishabh__18) April 27, 2022
Shami bhai making comeback, gets Kane for just 5.#GTvsSRH
— Aarav Halvadia (@Aarav3904) April 27, 2022
Captain Kane Williamson out ho gaya aur meri dream eleven team ke l laga gaya
— EX- MLA Mother india (ੴ) 🇮🇳 (@banarasi_pan97) April 27, 2022
Kane mama🥲
Ila snap pettagane ala out ayyav enti😢 pic.twitter.com/pyOxkyuPfW— vhaaRRRii (@MeeVHaariiii) April 27, 2022
केन विलियम्सनची आयपीएल २०२२मधील कामगिरी
केन विलियम्सनच्या आयपीएल २०२२मधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २१.१४च्या सरासरीने फक्त १४८ धावा केल्या आहेत. यामध्ये फक्त १ अर्धशतकाचा समावेश आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘सीएसके त्याचे कुटुंब आहे, बंदी उठल्यानंतर आनंदात होता माही’, इंग्लंडच्या दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया
‘बदलून टाका तो नियम’, पंत आणि आमरेंनी घातलेल्या राड्यानंतर मुंबईच्या प्रशिक्षकाची मोठी मागणी
चहलने सुधारली चूक! कार्तिकला रनआऊट करण्यात फुटला घाम, आधी चेंडू निसटला; मग घडलं असं काही