देशातर्गत क्रिकेटमधील राणाजी रणजी ट्रॉफी स्पर्धा सध्या सुरू आहे. हैदराबाद संघाचा तन्मय अग्रवाल याने शुक्रवारी (26 जानेवारी) सर्वांचे लक्ष वेधले. अरुणाचलविरुद्धच्या सामन्यात तन्मयने अवघ्या 160 चेंडूत 21 षटकारांच्या मदतीने 323* धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे सर्वात वेगवान तिहेरी शतक असून संघ देखील मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर हैदराबाद संघ 357 धावांनी आघाडीवर आहे.
हैदराबाद आणि अरुणाचर प्रदेश संघातील हा रणजी सामना हैदराबादमध्ये खेळला जात आहे. पहिल्या दिवशी हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तन्मय अग्रवाल याने अवघ्या 160 चेंडूत 323 धावा साकारल्या आणि दिवसाखेरील नाबाद देखील राहिला. सलामीवील फलंदाज आणि संघाचा कर्णधार गहलोत राहुल सिंग यानेही 105 चेंडूत 185 धावांचे योगदान दिले. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 345 धावांची भागीदारी पार पडली. परिणामी हैदराबादने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एका विकेटच्या नुकसानावर 529 धावा केल्या आहेत. तन्मयसह अभिरथ रेड्डी यानेही 24* धावांसह खेळपट्टीवर कायम आहे.
तन्मयने या सामन्यात अजून एक मोठा विक्रम केला. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात वेगवान त्रिशतक केलेच. पण सोबतच दुसरे सर्वात वेगवान द्विशतक देखील त्याच्याच नावावर झाले. अवघ्या 119 चेंडूत ही कामगिरी तन्मयने केली. तन्मानये या सामन्यात असाच खेळ सुरू ठेवला, तर तो दिग्गज ब्रायन लारा यांचा विक्रम मोडेल, असे बोलले जात आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी वेस्ट इंडीजचे माजी क्रिकेटपटू लारा यांच्याच नावावर आहे. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 501* धावांची खेळी केली होती. आता हैदराबादकडून खेळताना तन्मय हा विक्रम मोडू शकतो. त्याची धावा करण्याची गती पाहिली, तर दुसऱ्या दिवशी सुरुवातीच्या षटकांमध्येच तो लारांचा विक्रम मोडण्यासाठी दावेदार मानला जात आहे.
Tanmay Agarwal becomes the FIRST player to score 300+ runs in a single day in Ranji Trophy. pic.twitter.com/0VChbQiZGl
— Kausthub Gudipati (@kaustats) January 26, 2024
उभय संघांतील या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर अरुणाचल प्रदेशने प्रथम फलंदाजी केली. 39.4 षटकांमध्ये अरुणाच संघ 172 धावा करून सर्वबाद झाला. हैदराबादसाठी मिलिंद आणि कार्तिकेय काक यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स नावावर केल्या.
महत्वाच्या बातम्या –
IND vs ENG । हैदराबात कसोटीच्या दुसऱ्या दिवसाखेर भारत आघाडीवर, जडेजा शतकाच्या अगदी जवळ
26 जानेवारीला शतक झळकावणारे भारतीय फलंदाज, पाहा कोणीकोणी केलाय हा कारणामा