बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्कीन अहमद याला विश्वास आहे की भारतीय खेळाडू जगातील सर्वोत्तम आहेत आणि ते कोणत्याही परिस्थितीत चांगली फलंदाजी करू शकतात. त्यानं हे देखील कबूल केलं की, बांगलादेशच्या फलंदाजांनी सध्याच्या टी20 मालिकेत निराश केलं, ज्यामध्ये यजमान भारतानं एक सामना शिल्लक असताना 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.
टीम इंडियानं बांगलादेशविरुद्धचा पहिला सामना 7 गडी राखून आणि दुसरा सामना 86 धावांनी जिंकला. आता भारत या मालिकेत क्लीन स्वीप करण्याची शक्यता आहे. तस्किन प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाला की, “ते (भारतीय क्रिकेटपटू) केवळ घरच्याच नव्हे तर संपूर्ण जगात (सर्व परिस्थितींमध्ये) सर्वोत्कृष्ट आहे यात शंका नाही. ते आमच्यापेक्षा अधिक अनुभवी आणि चांगले आहेत.”
बुधवारी झालेल्या सामन्यात तस्किन, तन्झीम हसन साकिब आणि मुस्तफिझूर रहमान या वेगवान गोलंदाज त्रिकूटानं पॉवरप्लेमध्ये भारतीय आघाडीच्या फळीला बाद करून बांगलादेशला मजबूत स्थितीत आणलं होतं. मात्र त्यांच्या फिरकीपटूंना ही लय राखता आली नाही. खालच्या फळीत नितीश कुमार रेड्डी आणि रिंकू सिंग यांच्या भागीदारीनं भारतानं 221 धावांपर्यंत मजल मारली.
तस्किन म्हणाला, “आम्ही पॉवरप्लेमध्ये चांगली कामगिरी केली, परंतु शेवटी त्यांनी चांगली फलंदाजी केली. दुर्दैवानं फिरकीपटूंनी निराश केलं. सहसा असे वाईट दिवस येत नाहीत, पण टी20 फॉरमॅटमध्ये कोणत्याही दिवशी काहीही होऊ शकतं.” बांगलादेशसाठी 16 धावांत दोन विकेट घेणारा तस्किन म्हणाला, “आपल्या सर्वांना माहित आहे की दिल्लीचं मैदान हे मोठ्या धावसंख्येचं ठिकाण आहे. येथील सरासरी धावसंख्या 200 पेक्षा जास्त आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. दोन्ही सामन्यांच्या विकेट फलंदाजीसाठी अनुकूल होत्या, पण एक संघ म्हणून आम्ही आमच्या सर्वोत्तम क्षमतेनुसार खेळलो नाही.”
हेही वाचा –
बाबर आझमची कसोटी कारकीर्द संपली? मुलतानच्या पाटा खेळपट्टीवरही धावा निघेना
इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानच्या 6 गोलंदाजांचं ‘शतक’, 20 वर्षांनंतर बनला मोठा रेकॉर्ड
4 वर्षांत खोऱ्यानं धावा केल्या, तरीही रुट कोहलीचा हा रेकॉर्ड मोडू शकला नाही!