इंडियन प्रीमिअर लीगनंतर आता भारतात महिला प्रीमिअर लीगचाही घाट घातला जाणार आहे. या स्पर्धेला 4 मार्चपासून सुरुवात होणार असून स्पर्धेचा अंतिम सामना 26 मार्च रोजी खेळवला जाणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आता टाटा समूहाच्या रूपात महिला प्रीमिअर लीगचा टायटल स्पॉन्सरची घोषणा झाली आहे. टाटा समूह आधीपासूनच आयपीएलचा टायटल स्पॉन्सर आहे. अशात महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्याची जबाबदारीही बीसीसीआयने टाटांकडे सोपवली आहे.
महिला प्रीमिअर लीग 2023साठी टाटा ग्रूप टायटल स्पॉन्सर
इंडियन प्रीमिअर लीगनंतर आता टाटा समूहाने पहिल्या महिला प्रीमिअर लीग (Womens Premier League 2023) टायटलचे अधिकारही मिळवले आहेत. हा करार 2023 ते 2027 पर्यंत असेल. याद्वारे टाटा समूह त्यांच्या दोन प्रमुख टाटा कॅपिटल आणि टाटा मोटर्स या दोन ब्रँड्सचे प्रमोशन करणार आहे. महिला प्रीमिअर लीगची सुरुवात होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी ट्वीट करत याची घोषणा केली आहे.
🚨 NEWS 🚨: BCCI awards title sponsorship rights for Women’s Premier League to TATA Group. #WPL
More Details 🔽 https://t.co/qzLq8ObjFT
— Women's Premier League (WPL) (@wplt20) February 22, 2023
जय शाहांचे ट्वीट
जय शाह ट्वीट (Jay Shah Tweet) करत म्हणाले की, “मला ही घोषणा करताना अत्यंत आनंद होत आहे की, टाटा समूह पहिल्या डब्ल्यूपीएलचा टायटल प्रायोजक असेल. त्यांच्या सहयोगाने मला पूर्ण विश्वास आहे की, आपण महिला क्रिकेटला वेगळ्या स्तरावर घेऊन जाऊ शकतो.”
I am delighted to announce the #TataGroup as the title sponsor of the inaugural #WPL. With their support, we're confident that we can take women's cricket to the next level. @BCCI @BCCIWomen @wplt20 pic.twitter.com/L05vXeDx1j
— Jay Shah (@JayShah) February 21, 2023
या कराराच्या आर्थिक गोष्टींबाबत खुलासा झाला नाहीये. माध्यमांतील वृत्तांनुसार, टाटा समूहाने 5 वर्षांसाठी अधिकार मिळवले आहेत. टाटाने मागील वर्षी आयपीएलचेही अधिकार मिळवले होते. महिला प्रीमिअर लीगचे मीडिया हक्क वायकॉम 18ने जिंकले आहेत. पाच वर्अषांसाठी मीडिया हक्कांमध्ये 951 कोटी रुपयांचा करार झाला आहे.
पाच संघात 22 सामने
बीसीसीआयने यापूर्वीच महिला प्रीमिअर लीगचे वेळापत्रक (Womens Premier League Timetable) जाहीर केले होते. या पहिल्या हंगामात एकूण 5 संघात 22 सामने खेळले जातील. महिला प्रीमिअर लीगमधील सामने मुंबईच्या ब्रेबॉर्न आणि डीवाय पाटील स्टेडिअममध्ये खेळले जातील. या स्पर्धेत एकूण 5 संघ भाग घेत आहेत. त्यात मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, यूपी वॉरिअर्स यांचा समावेश आहे.
सामन्याची सुरुवात 4 मार्चपासून होणार असून पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स (Mumbai Indians vs Gujarat Titans) संघात होईल. या स्पर्धेत एकूण 20 साखळी सामने आणि दोन प्लेऑफ सामने असतील. हे सामने 23 दिवस खेळले जातील. तसेच, स्पर्धेत एकूण 4 डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) सामने असतील. पहिला डबल हेडर सामना दुपारी 3.30 वाजता, तर दुसरा सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल. (tata group bagged the title rights for the inaugural womens premier league beginning know more)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जडेजाचा कसोटीत नवा कीर्तिमान, स्वत:चाच रेकॉर्ड केला उद्ध्वस्त; बातमी वाचलीच पाहिजे
वयाच्या 40व्या वर्षी जेम्स अँडरसनची कमाल, पुन्हा बनला नंबर 1 कसोटी गोलंदाज