---Advertisement---

Tata Open: टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत फ्रांसच्या जिल्स सिमॉनचा अव्वल मानांकित मरिन चिलीचवर रोमहर्षक विजय

On: शुक्रवार, जानेवारी 5, 2018 8:18 PM
---Advertisement---

पुणे: टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत एकेरीत उपांत्य फेरीत फ्रांसच्या जिल्स सिमॉन याने अव्वल मानांकित मरिन चिलीचवर सनसनाटी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

 

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत पाहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत जागतिक क्रमवारीत 89व्या स्थानावर असलेल्या फ्रांसच्या जिल्स सिमॉन याने आपली विजयी मालिका कायम ठेवत जागतिक क्रमवारीत 6व्या स्थानावर असलेल्या क्रोएशियाच्या मरिन चिलीचचा 1-6, 6-3, 6-2 असा तीन सेटमध्ये पराभव करून दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली.

 

तब्बल 1 तास 51 मिनिटे चाललेल्या या उत्कंठावर्धक सामन्यात पहिल्या सेटमध्ये क्रोएशियाच्या मरिन चिलीच आपले वर्चस्व कायम राखले. या सेटमध्ये चिलीच याने चपळाईने व आक्रमक खेळ केला.

 

दुसऱ्या, चौथ्या गेममध्ये चिलीच याने सिमॉनची सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस रोखत हा सेट 6-1 असा सहज जिंकून सामन्यात 1-0अशी आघाडी घेतली. हा सेट 28मिनिटे चालला. दुसऱ्या सेटमध्ये सामन्यात पिछाडीवर असलेल्या सिमॉन याने जबरदस्त कमबॅक करत दुसऱ्याच गेममध्ये चिलीचची सर्व्हिस भेदली व सामन्यात 2-0अशी आघाडी घेतली.

 

सिमॉनच्या ताकदवान ग्राउंडस्ट्रोक व सर्व्हिसेसमोर अनुभवी चिलीच याची खेळी निष्प्रभ ठरली. यानंतर सिमॉन याने चौथ्या गेममध्ये चिलीचची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-3 असा जिंकून बरोबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये सिमॉन याने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले.

 

सिमॉन याने पहिल्या, सातव्या गेममध्ये चिलीचची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-2 अशा फरकाने जिंकून विजेतेपदाच्या दिशेने एक पाउल पुढे टाकले.

 

मरिन चिलीच व जिल्स सिमॉन यांच्यातील सामन्याचा टॉस शिवसेना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा हस्ते करण्यात आला.

 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी: एकेरी:

मरिन चिलीच(क्रोएशिया)(1) पराभूत.वि. जिल्स सिमॉन(फ्रांस)  6-1, 3-6, 2-6

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment