मलेशियातील क्वालालंपूर येथे होणाऱ्या आयसीसी अंडर-19 महिला टी20 विश्वचषक 2025 साठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये निक्की प्रसादकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. तर सानिका चाळकेला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. भारतासाठी अंडर-19 आशिया कप स्पर्धेत सहभागी झालेल्या बहुतेक खेळाडूंना संघात संधी मिळाली आहे. भारतीय महिला संघाने बांग्लादेशचा पराभव करत अंडर-19 आशिया कपचे विजेतेपद पटकावले.
2025 च्या अंडर-19 महिला विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात कमलिनी जी आणि भाविका अहिरे या दोन यष्टीरक्षक आहेत. कमलिनीने अंडर-19 आशिया कप 2024 मध्ये भारतीय संघासाठी दमदार कामगिरी केली होती आणि पाकिस्तानविरुद्धचा सामना स्वबळावर जिंकला होता. बांगलादेशविरुद्धच्या फायनलमध्ये 52 धावा करणाऱ्या जी त्रिशालाही स्थान मिळाले आहे.
19 वर्षाखालील महिला विश्वचषक 2025 मध्ये एकूण 16 संघ सहभागी होतील. ज्यांची चार गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. भारत हा गतविजेता आहे आणि यजमान मलेशिया, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेसह त्याला अ गटात ठेवण्यात आले आहे. भारत 19 जानेवारीला वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्यापासून मोहिमेला सुरुवात करेल. त्यानंतर संघ मलेशिया (21 जानेवारी) आणि श्रीलंकेविरुद्ध (23 जानेवारी) सामने खेळणार आहे.
या स्पर्धेत 19 ते 23 जानेवारी दरम्यान ग्रुप स्टेजचे सामने खेळवले जातील. प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ 25 ते 29 जानेवारी दरम्यान होणाऱ्या सुपर सिक्समध्ये प्रवेश करतील. सुपर सिक्समध्ये प्रत्येकी सहा संघांचे दोन गट असतील. सुपर सिक्समधील प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ 31 जानेवारी रोजी खेळल्या जाणाऱ्या उपांत्य फेरीत प्रवेश करतील. फायनल 2 फेब्रुवारीला होणार आहे.
🇮🇳 India Squad for the U-19 Women’s T20 World Cup 2025 Announced!
Niki Prasad to lead, Sanika Chalke will be her deputy. 🏏#CricketTwitter pic.twitter.com/uPgHh18P30
— Female Cricket (@imfemalecricket) December 24, 2024
अंडर-19 महिला विश्वचषक 2025 साठी भारतीय संघ:
निक्की प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके (उपकर्णधार), जी त्रिशा, कमलिनी जी (यष्टीरक्षक), भाविका अहिरे (यष्टीरक्षक), ईश्वरी अवसरे, मिथिला विनोद, जोशिता व्हीजे, सोनम यादव, पारुनिका सिसोदिया, केसरी धृती, आयुषी शुक्ला आनंदिता किशोर, एमडी शबनम, वैष्णवी एस.
राखीव खेळाडू: नंदना एस, इरा जे, अनाडी टी
हेही वाचा-
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये एका सामन्यात सर्वाधिक झेल घेणारे खेळाडू (टाॅप-5)
Neeraj Chopra Birthday: भालाफेकीत 2 ऑलिम्पिक पदके जिंकणारा एकमेव भारतीय
बॉक्सिंग डे कसोटीत ट्रॅव्हिस हेड खेळणार की नाही? गाबा कसोटीत झाला होता दुखापतग्रस्त