---Advertisement---

आता टिकाकारांची बसणार दातखिळी! ‘आऊट ऑफ फॉर्म’ हार्दिकने फिटनेसवर सुरू केलंय काम- Video

On: मंगळवार, डिसेंबर 7, 2021 10:09 PM
Hardik Pandya Workout Video
---Advertisement---

हार्दिक पंड्या याने गेल्या काही वर्षांतील त्याच्या अष्टपैलू प्रदर्शनाने भारतीय संघातील आपले स्थान जवळजवळ निश्चित केले होते. वेगवान गोलंदाजी अष्टपैलू म्हणून संघ निवडकर्त्यांची त्याला पहिली पसंती असायची. परंतु मागील काही काळापासून आपल्या कंबरेच्या दुखापतीशी झगडत असलेला हार्दिक गोलंदाजी करण्यास अक्षम आहे. याबरोबरच फलंदाजीतही त्याला लौकिसास साजेशी कामगिरी करता आलेली नाहीये. त्यामुळे तो टिकाकारांच्या निशाण्यावर आला आहे. मात्र आता याच हार्दिकने (Hardik Pandya) आपल्या फिटनेसवर काम करायला सुरुवात (Hardik Working On Fitness) केली आहे.

हार्दिकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत तो वेगवेगळ्या प्रकारच्या कसरती करताना दिसतो आहे. या व्हिडिओवर त्याने लिहिले आहे की, ‘Renewed, Rejuvenated, Reloading.’

अर्थातच हार्दिक पूर्वीसारखा फिट होत पुन्हा एकदा भारतीय संघातील आपली जागा परत मिळवण्यासाठी सज्ज होतो आहे. त्याला अशाप्रकारे आपल्या फिटनेसवर मेहनत घेत असल्याचे पाहून त्याचे चाहते भलेतच आनंदित आहेत.

https://www.instagram.com/reel/CXK1WVrqm7U/?utm_source=ig_web_button_share_sheet

मुंबई इंडियन्सने केले संघाबाहेर
टी२० विश्वचषक २०२१, तत्पूर्वी आयपीएल २०२० आणि २०२१ मध्ये फिटनेसच्या कारणास्तव हार्दिकला जास्त गोलंदाजी करता आली नव्हती. याच कारणामुळे त्याला नुकत्याच संपलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० आणि कसोटी मालिकेतून वगळण्यात आले होते. इतकेच नव्हे तर, आयपीएलमधील त्याच्या मुंबई इंडियन्स फ्रँचायझीनेही त्याला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. रिटेंशन प्रक्रियेदरम्यान मुंबईने त्याच्या नावाचा समावेश केलेला नाही.

हार्दिक पंड्याचा भविष्याबाबत मोठा निर्णय
म्हणूनच आता तो त्याच्या फिटनेसवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू इच्छित आहे. त्याने याबाबत राष्ट्रीय निवडकर्त्यांना सांगितले आहे. फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तो पुढच्या काही काळासाठी क्रिकेटपासून दूर राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर त्याने भारतीय संघाच्या राष्ट्रीय निवडकर्त्यांनाही सांगितले आहे की, काही काळासाठी त्याच्या नावावर विचार करू नका. कारण, तो पूर्पपणे फिट होण्यावर लक्ष देत आहे. अर्थातच, हार्दिक गोलंदाज म्हणून पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी त्याने निवडकर्त्यांकडे काही वेळ मागितला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पुन्हा क्रिकेटचं मैदान गाजवणार युवराज सिंग! व्हिडिओ शेअर करत म्हणे, ‘दुसऱ्या इनिंगची वेळ आलीय’

‘या’ अनुभवी खेळाडूच्या डोक्यावर फुटले न्यूझीलंडच्या पराभवाचे खापर; कर्णधार म्हणाला, ” त्याच्यावर जबाबदारी होती…”

बडे दिनो बाद! युवी-माहीचे नवे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---