शनिवारी (28 जुलै) रोजी भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यामध्ये 3 सामन्यांच्या टी20 मालिकेमधील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात भारतानं मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि कर्णधार सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) मार्गदर्शनाखाली 43 धावांनी विजय मिळवला आणि 1-0 अशी आघाडी घेतली. तत्पूर्वी भारतीय संघाचा प्रतिभावान अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलनं (Axar Patel) सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाबद्दल वक्तव्य केलं आहे.
सामना संपल्यानंतर अक्षर पटेल (Axar Patel) प्रेस काॅन्फ्रेंसमध्ये म्हणाला, “ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या मालिकेत मी सूर्याभाईसोबत खेळलो. तो गोलंदाजांचा कर्णधार आहे हे मला माहीत आहे. तो तुम्हाला प्रथम निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देतो. जेव्हा तुम्ही मोठा फटका मारता तेव्हा तो येतो आणि म्हणतो की तो चांगला चेंडू होता. तो तुम्हाला उर्जा देत राहतो. एक खेळाडू म्हणून माझे त्याच्याशी चांगले संबंध आहेत”
पुढे बोलताना अक्षर पटेल म्हणाला, “एक कर्णधार म्हणून मी त्याच्यासोबत गेल्या पाच सामन्यांमध्ये (ऑस्ट्रेलियाविरुद्ध) खेळलो आहे आणि आज खेळत असताना मला फारसा बदल जाणवला नाही. तो मला सांगत होता की आपण हे किंवा ते करु शकतो आणि आपण विकेट कसे काढू शकतो. चौकार किंवा षटकार मारला तर हरकत नाही. एक गोलंदाज म्हणून जर कर्णधार तुम्हाला सपोर्ट करत असेल आणि तुम्ही हे करु शकता असे सांगत असेल तर त्यामुळे तुम्हाला आत्मविश्वास मिळतो.”
अक्षर पटेलचं (Axar patel) वय सध्या 30 वर्ष आहे. त्यानं भारतासाठी 14 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं 646 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 35.88 आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्यानं आतापर्यंत 4 अर्धशतक झळकावले आहेत. त्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 84 राहिली आहे. तर 57 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यानं 97.99च्या स्ट्राईक रेटसह 489 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 2 अर्धशतक आहेत. तर 57 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्यानं 463 धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 64 आहे.
अक्षरच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर, 14 आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात त्यानं आतापर्यंत 55 विकेट्स घेतल्या आहेत. तर 57 एकदिवसीय सामन्यात त्यानं 60 तर 61 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्यानं आतापर्यंत 60 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या–
कसोटीमध्ये सर्वात जलद 12,000 धावा करणारे टॉप 3 खेळाडू, पहिल्या स्थानावर श्रीलंकेचा दिग्गज
टीकाकारांना रियान परागचं सडेतोड उत्तर! हेड कोच गंभीरची ती चाल…
स्टार खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती मागे! वेस्ट इंडिजसाठी खेळणार टी20 विश्वचषक