भारतीय महिला क्रिकेट संघाला महिला आशिया कप 2024 मध्ये त्यांच्या दुसऱ्या सामन्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाची अष्टपैलू खेळाडू श्रेयंका पाटील डाव्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे महिला आशिया चषक 2024 मधून बाहेर पडली आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) शनिवारी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, 21 वर्षीय भारतीय ऑफस्पिनरच्या डाव्या हाताच्या चौथ्या बोटात फ्रॅक्चर झाले आहे.
श्रेयंकाने शुक्रवारी (19 जुलै) पाकिस्तानविरुद्ध 3.2 षटके टाकली आणि 14 धावांत 2 बळी घेतले. भारताने 14.2 षटकांत सात विकेट्स गमावून विजय मिळवल्यामुळे त्याला फलंदाजीची गरज नव्हती. श्रेयंकाने भारताकडून 3 एकदिवसीय सामन्यात 5 विकेट्स आणि 12 टी-20 मध्ये 16 विकेट घेतल्या आहेत. वास्तविक, भारताच्या श्रेयंका पाटीलला श्रीलंकेतील डंबुला येथे पाकिस्तानविरुद्धच्या स्पर्धेतील संघाच्या पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. तर श्रेयंका पाटीलच्या जागी 26 वर्षीय लेफ्ट आर्म अनकॅप्ड फिरकीपटू तनुजा कंवरचा संघात समावेश करण्यात आला आहे. तनुजा महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये गुजरात जायंट्स (GT) आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये रेल्वेकडून खेळते.
गतविजेता भारतीय महिला क्रिकेट संघ रविवारी आशिया चषकाच्या दुसऱ्या सामन्यात संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्ध खेळणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिल्या सामन्यात आपला सर्वात मोठा प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला होता. ज्यामुळे भारतीय संघ ‘अ’ गटातील गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसरीकडे यूएई संघाने शुक्रवारी नेपाळ विरुद्ध सहा गडी राखून स्पर्धेचा पहिला सामना गमावल्यानंतर त्यांच्या दुसऱ्या सामन्यात उतरत आहे.
महिला आशिया चषक 2004 मध्ये सुरू झाला. महिला आशिया चषक आतापर्यंत 8 वेळा आयोजित करण्यात आला आहे. ज्यामध्ये भारताने ही स्पर्धा 7 वेळा जिंकली आहे तर बांग्लादेशने 1 वेळा आशिया कप जिंकला आहे. तर यंदाच्या आशिया कप साठी भारतीय संघ प्रबळ दावेदार असल्याचे बोलले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित शर्मा आयपीएल 2025 पूर्वी मुंबई इंडियन्सची सोडणार साथ! अहवालात धक्कादायक खुलासा
श्रीलंकादाैऱ्यापूर्वी हेड कोच ‘गंभीरची’ पहिली पत्रकार परिषद या दिवशी होणार, निवडकर्ता अजित आगरकरही उपस्थितीत
IPL 2025: मेगा ऑक्शनपूर्वी बीसीसीआय आणि संघ मालक येणार एकत्र; पाहा बैठकीचा मुख्य अजेंडा