टीम इंडीयाचा उप कर्णधार हार्दिक पांड्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये धमाकेदार पुनरागमन झाले आहे. पांड्या वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर पहिल्यांदाच टीम इंडीयासाठी आयर्लंड विरुद्ध च्या सामन्यात मैदानात उतरला होता. टी20 विश्वचषकात हार्दिकने पहिल्याच सामन्यात भेदक गोलंदाजी केली . त्याने 4 षटकात 3 विकेट्स घेतल्या. पांड्याने न्यूयॉर्कमधील नासाउ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमच्या सीमिंग परिस्थितीत गोलंदाजीत आश्चर्यकारक कामगिरी केली. सामन्यात पाॅवरप्ले नंतर गोलंदाजीस आलेल्या हार्दिकच्या खतरनाक बाउंसर्सचा आयर्लंडच्या फलंदाजांकडे कोणतेही उत्तर नव्हते.
𝙃𝙋’s dishing out numbers tonight! 🔥#T20WorldCup #INDvIRE pic.twitter.com/xcTsGxE93Z
— Mumbai Indians (@mipaltan) June 5, 2024
आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्या आपल्या वाईट काळाशी झगडत होता. हार्दिकच्या नेतृत्वात मंबई इंडीयन्स 2024 च्या हंगामातून बाहेर पडणार पहिला संघ ठरला होता. आयपीएल मध्ये फलंदाजीत संघर्ष करताना दिसला. त्याने 14 सामन्यात केवळ 216 धावा केल्या होत्या, तर गोलंदाजीत 11 विकेट्स घेतल्या होत्या. आयपीएल 2024च्या सुरुवातीच्या काळात चाहत्यांद्वारे त्याला ‘बू’ करण्यात आले होते. या कठीण काळावर मात करुन हार्दिक पांड्या टीम इंडीया मध्ये येताच फाॅर्म मध्ये परतला आहे.
टी20 विश्वचषकात भारताच्या पहिल्या सराव सामन्यातही बांग्लादेश विरुद्ध हार्दिकने आक्रमक फलंदाजी केली होती. यासह हार्दिक पांड्या आता टी20 विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यापैकी संयुक्त तिसरा गोलंदाज बनला आहे. त्याने टी20 विश्वचषकात 14 सामन्यात 16 विकेट्स घेतल्या आहेत.
टीम इंडीया आयर्लंड विरुद्ध एकतर्फी सामना जिंकला. सामनावीरचा पुरस्कार जसप्रीत बुमराहला देण्यात आला. कर्णधार रोहित शर्माने देखील 52 धावा केल्या. यासह भारतीय संघ टी20 विश्वचषकात आपल्या मोहिमेला विजयाने सुरुवात केली. तर आता 9 जून रोजी भारताचा दुसरा सामना पाकिस्तान विरुद्ध होणार आहे.
महत्तवाच्या बातम्या-
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार का दुसऱ्या मैदानावर? जाणून घ्या एका क्लिकवर
ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकवणारा पॅट कमिन्स, टी20 विश्वचषकात मात्र दिसतोय ‘या’ भूमिकेत!
2023च्या विश्वचषकाबद्दल कर्णधार रोहित शर्मानंं केला मोठा खुलासा!