रांची । वनडे मालिकेत मोठ्या पराभवाला सामोरे गेल्यावर ऑस्ट्रेलिया संघ टी२० मालिकेत पुन्हा एकदा नव्या अशा घेऊन मैदानावर उतरेल. उद्या रांची शहरात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी२० सामना होणार आहे.
आजपर्यत या मैदानावर १ कसोटी, ४ वनडे आणि १ टी२० सामना झाला आहे. २०१२ साली ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध टी२० प्रकारात शेवटचा विजय मिळवला आहे. त्यांनतर आजपर्यंत ६ टी२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली आहे.
सध्या टी२० विजेते असणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध भारताने अतिशय चांगली कामगिरी केली आहे. आजपर्यँत हे दोन देश १३ टी२० सामने खेळले असून त्यात भारताने ९ विजय मिळवले आहेत. तर ४ सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. भारताने गेल्या ६ सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आहे त्यात एका टी२० मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर व्हाईट-वॉश दिला आहे.
ऑस्ट्रेलिया संघ आजपर्यंत भारतात ३ सामने खेळला असून तीनही सामने हरला आहे. ऑस्ट्रेलियामध्येही भारताने ६ पैकी ४ सामने जिंकले आहेत तर विश्वचषकात भारतीय संघाने ५ पैकी ३ लढती जिंकल्या आहेत. त्रयस्थ ठिकाणी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने ४ पैकी २ सामने जिंकले आहे. टी२० प्रकारात भारतीय संघाने आजपर्यंत ऑस्ट्रेलिया संघाला कधीही संधी दिली नाही.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया गेल्या ६ सामन्यातील कामगिरी
१. १० ऑक्टोबर, राजकोट, भारत ६ विकेटने जिंकला
२. ३० मार्च २०१४, ढाका, भारत ७३ धावांनी जिंकला
३. २६जनवरी २०१६, अँडलेड, भारत ३७ धावांनी जिंकला
४. २९ जनवरी २०१६, मेलबर्न, भारत २७ धावांनी जिंकला
५. ३१ जनवरी २०१६, सिडनी, भारत ७ विकेटने जिंकला
६. २७ मार्च २०१६, मोहाली, भारत ६ विकेटने जिंकला
भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार ), शिखर धवन, केएल राहुल , मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, एमएस धोनी (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आशिष नेहरा , अक्षर पटेल.