आशिया चषक जिंकल्यानंतर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. मायदेशात ही वनडे मालिका खेळली जाणार असून 22 सप्टेंबर रोजी पहिला असेल. सोमवारी (18 सप्टेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली गेली. केएल राहुल या संघाचा कर्णधार असेल. पहिल्या दोन सामन्यांमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पंड्या यांनी विश्रांती दिली गेली, पण शेवटच्या वनडेसाठी त्यांना पुन्हा संघात सामील केले गेले आहे.
कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुख्य निवडकर्ते यांनी ही संघ एकमताने निवडला आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी एक आणि शेवटच्या सामन्यासाठी दुसरा संघ घोषित केला गेला. पहिल्या दोन वनडे सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या यांच्यासह कुलदीप यादव या चार महत्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिली गेली. पण हेच चारही फलंदाज शेवटच्या वनडे सामन्यात सामील आहेत. या तिघांचे संघात पुनरागमन झाल्यानंतर तिसऱ्या वनडेसाठीच्या संघातून ऋतुराज गायकवाड याचे नाव कमी दिसते.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत सर्वांची नजर असेल तर फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याच्यावर. अश्विन याने भारतासाठी शेवटचा वनडे सामना जानेवारी 2022 मध्ये दक्षिण आप्रिकेविरुद्ध खेळला होता. जवळपास 20 महिन्यांनंतर अश्विन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून भारतासाठी वनडे सामना खेळणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत बारताला विजेतेपद मिळाले. पण अश्विनला या संघात संधी न दिल्यामुळे संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांवर मोठ्या प्रमाणात टीका केली गेली होती. मायदेशात खेळल्या जाणार्या वनडे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर अश्विनची या मालिकेसाठी केली गेलेली निवड महत्वाची ठरू शकते.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ –
केएल राहुल (कर्णधार), रविंद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन, शार्दुल ठाकूर, वॉशिंगटन सुंदर, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
(Team India announced for ODI series against Australia , key bowler’s comeback, key batsman rested)
महत्वाच्या बातम्या –
मायदेशात परतल्यानंतरही कर्णधार रोहितने जिंकले मन! चाहत्यांसाठी थांबवली आपली मर्सिडीज एस क्लास
गंभीरच्या मनातही धोनीविषयी आदर! माजी दिग्गजाचे नवे विधान ऐकून तुम्हालाही नाही बसणार विश्वास