वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील चौथा सामना शनिवारी (12 ऑगस्ट) खेळला जाईल. अमेरिकेतील फ्लोरिडा येथे हा सामना होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी भारताचे युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल व तिलक वर्मा यांच्याबद्दल महत्त्वाचे वक्तव्य केले.
मालिकेतील चौथा सामना फ्लोरिडा येथे होणार आहे. या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पारस यांनी भारतीय संघाचा रणनीतीविषयी काही खुलासे केले. यावेळी बोलताना ते म्हणाले,
“सध्या भारतीय संघाकडे गोलंदाजीत अनेक पर्याय दिसून येतात. पुढील सामन्यांमध्ये आम्ही तिलक वर्मा व यशस्वी जयस्वाल यांना देखील कमीत कमी एक षटक गोलंदाजी करण्यास सांगणार आहे. ज्याचा संघाला निश्चितच फायदा होईल.”
तिलक याने याच मालिकेतील पहिल्या सामन्यात पदार्पण केले होते. त्याने तीनही सामन्यात प्रभावित करताना अनुक्रमे 39, 53 व नाबाद 49 अशा खेळ्या केल्या आहेत. तर, यशस्वी याने तिसऱ्या सामन्यात टी20 पदार्पण केले. मात्र, तो केवळ एक धाव काढून बाद झाला. तिलक हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये फलंदाजीसह उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाजी देखील करतो. तर, यशस्वी अनेक वेळा आयपीएल व देशांतर्गत क्रिकेटमध्ये लेग स्पिन गोलंदाजी करताना दिसला आहे.
सध्या भारतीय संघात कुलदीप यादव व युजवेंद्र चहल हे फिरकी गोलंदाज असून, अष्टपैलू अक्षर पटेल व रवींद्र जडेजा हेदेखील नियमितपणे संघाचा भाग असतात.
(Team India Bowling Coach Paras Mhambrey Said Will Will Try Tilak And Yashasvi As Bowlers)
महत्वाच्या बातम्या-
“ईशानची ती जागा नक्की करा”, वर्ल्डकपआधी दिग्गजाने दिला टीम इंडियाला सल्ला
“लोकांच्या भावना असतात तर…”, भारत-पाकिस्तान सामन्याविषयी हे काय बोलला हार्दिक?






