---Advertisement---

‘भारतीय स्पीडगन’ उमरानचे टीम इंडियात निवड झाल्याबद्दल इरफान पठाणबरोबर खास सेलिब्रेशन, Video व्हायरल

On: मंगळवार, मे 24, 2022 3:44 PM
Umran-Malik-Irfan-Pathan
---Advertisement---

उमरान मलिक लवकरच भारतीय संघाच्या जर्सीमध्ये दिसू शकतो. जून महिन्यात होणाऱ्या दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या पाच टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. यावेळी त्याने भारतीय संघात स्थान मिळाल्याबद्दलचा आनंद एका वेगळ्याच पद्धतीने साजरा केला आहे.

साल २०२२च्या आयपीएलमध्ये २२ विकेट घेणाऱ्या उमरानला पुढे आणण्यात इरफान पठाणचा योगदान असल्याचे मानले जाते. भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाण हा जम्मू आणि काश्मीर संघाचा मार्गदर्शक होता. या काळामध्ये त्याने उमरानच्या गोलंदाजीत अजून भर घालत त्याचे कौशल्य सुधारवण्यास मदत केली.

राष्ट्रीय संघात निवड झाल्याचा मोठा आनंद उमरानने पठाणसोबत छोटा केक कापून व्यक्त केला. याचे फोटो पठाणने ‘संघात पदार्पण झाल्याने एक छोटे सेलेब्रेशन’, असे कॅप्शन देत ट्विटरवर पोस्ट केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Irfan Pathan (@irfanpathan_official)

इरफान पठाणने सनरायझर्स हैद्राबाद संघाचा मार्गदर्शक व्हीव्हीएस लक्ष्मणशी चर्चा केल्यावर उमरानला संघात नेटबॉलर म्हणून घेतले होते. पठाणबरोबरच अब्दूल समादनेही २०२१मध्ये उमरानच्या गोलंदाजीचे काही व्हीडीओ संघ प्रशिक्षक टॉम मूडी आणि लक्ष्मण यांना दाखवले होते, असे रिपोर्ट्स मीडियामध्ये आले होते. जलदगती गोलंदाज टी नटराजन जखमी झाल्याने उमरानचा संघात समावेश करण्यात आला.

उमरान आणि सामद हे दोघे आयपीएलमध्ये एकाच संघाकडून खेळतात. तीन वर्षापासून उमरान टेनिसच्या चेंडूने सराव करत होता. त्यावेळी समादही त्याच्यासोबत सराव करत असे. तेव्हा समाद हैद्राबादच्या संघात होता. त्याचे भारतीय संघात समावेश झाल्याबद्दल समादनेही अभिनंदन केले आहे.

उमरानने २०२२च्या आयपीएलमध्ये सर्वात जलद असा १५७ किमी प्रति तास या वेगाने चेंडू टाकला. हा चेंडू आयपीएलच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा जलद चेंडू ठरला. तर आयपीएलच्या इतिहासामध्ये सर्वात जलद चेंडू टाकणारा तो भारतीय गोलंदाज ठरला आहे.

आयपीएलमध्ये सर्वात जलद चेंडू टाकणारे गोलंदाज (किमी प्रति तास)-
१. शॉन टेट – १५७.७
२. उमरान मलिक – १५७
३. एन्रीच नॉर्किया – १५६.२
४. एनरिच नोर्तजे – १५४.८
५. डेल स्टेन – १५४.४

इरफान पठाणने आपल्याला गोलंदाजीत कशाप्रकारे मदत केली हे एनडीटीव्हीला खास मुलाखत देताना उमरानने सांगितले होते की, “गती माझ्याकडे नैसर्गिकच होती. पण इरफान पठाण हे जेव्हा आम्हाला ट्रेनिंग देण्यासाठी आले होते, तेव्हा त्यांनी माझ्या चेंडू योग्य दिशेने टाकण्याऱ्या कौशल्याचा कसून सराव करून घेतला.”

२०२१चे तीन आयपीएल सामने खेळताना उमराने त्या हंगामातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जलद असा १५३ च्या वेगाने चेंडू टाकला होता. त्या हंगामात जलद चेंडू टाकणाऱ्या पहिल्या २० गोलंदाजांमध्ये त्याचे नाव पाच वेळा आले होते.

महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

‘हा’ गोलंदाज म्हणतोय, ‘मी बॉलिंग करत असताना शेन वॉर्न मला आभाळातून बघत असतो’

‘दिनेश कार्तिकला परत संधी दिली, मग शिखर धवनला का नाही’, दिग्गज भारतीय क्रिकेटपटूचा प्रश्न

पहिल्या ३ सामन्यात ३० विकेट्स, ईडन गार्डनवर हॅट्रिक; मग सर्वांपुढे भारतीय संघाला केले लाजिरवाणे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---