---Advertisement---

टीम इंडिया फायनलमध्ये पोहचताच कर्णधार रोहित शर्मा भावूक, कोहलीनं सावरंल

On: शुक्रवार, जून 28, 2024 8:53 AM
---Advertisement---

यंदाच्या टी20 विश्वचषकात भारतीय संघाने आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर सेमीफायनलमध्ये धडक मारली. भारतीय संघाच्या आतापर्यंतच्या प्रवसात सर्व खेळाडूंचा वाटा आहे. टीम इंडिया सुपर-8 च्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला धूळ चारत सेमीफायनलमध्ये धडक मारली. काल (27जून) झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात सेमीफायनल-2 मध्ये टीम इंडियाने इंग्लंडला 68 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर भारत फायनल मध्ये प्रवेश मिळवला. या दरम्यान कर्णधार रोहित शर्मा भावूक झाला. त्याच्या डोळ्यात विजायाचे आनंदाआश्रू पहायला मिळाले.

टी20 विश्वचषक 2024 च्या सेमीफायनल-2 मध्ये भातीय संघाने प्रथम फलंदाजी करत 171 धावांचे तगडे लक्ष्य इंग्लंड समोर ठेवले होते. धावांचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजी युनीट समोर इंगलंड संघ डगमगला. संघास 20 षटके देखील खेळता आले नाही. 16.4 षटकात 103 धावांवर सर्वबाद झाला. या विजयानंतर कर्णधार रोहित शर्माच्या डोळ्यातून आनंदाश्रू पहायला मिळाले. यादरम्यान तो भावूक झाला होताय याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

तिन्ही विभागात शानदार कामगिरी करत भारताने हा सामना मोठ्या दिमाखात जिंकला. इंग्लंड संघाने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात फलंदाजीस आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. मात्र दुसऱ्या षटकाच्या चाैथ्या चेंडूवर कोहली रुपात टीम इंडियाला पहिला धक्का बसला. कोहली 9 धावा करुन परतला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या रिषभ पंत देखील स्वस्तात बाद झाला त्याला सॅम करनने 4 धावांवर तंबूत पाठवले. मात्र एक टोक सांभाळून ठेवत रोहित शर्मा शानदार 57 धावांची खेळी करत सुर्यकूमार यादव सोबत निर्णायक भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाने 171 धावांचे अव्हान इंग्लंड समोर ठेवले.

धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघ भारतीय गोलंदाजीच्या माऱ्यासमोर गुडघे टेकल्याचे पहायला मिळाले. संघाला मर्यादित 20 षटके देखील खेळता आले नाही. संपूर्ण संघ 16.4 षटकातच माघारी परतला. भारताने हा सामना 68 धावंनी जिंकाला.

महत्तवाच्या बातम्या-

बदला पूर्ण! इंग्लंडला हारवून भारताची फायनलमध्ये थाटात एँट्री…!
कोहलीचा 8 वर्षापूर्वीचा गोलंदाजी रेकाॅर्ड अक्षर पटेलनं काढला मोडीत
कर्णधार रोहित शर्माचं झंझावाती अर्धशतक! भारताचं इंग्लंडसमोर 172 धावांचं आव्हान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---