ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील तिसऱ्या कसोटीनंतर अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने अचानक निवृत्ती घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्याच्या जाण्यामुळे संघातील पोकळी भरून काढण्यासाठी, बीसीसीआयने सोमवारी (23 डिसेंबर) मुंबईचा ऑफ-स्पिन अष्टपैलू तनुष कोटियनचा बॉर्डर-गावस्कर स्पर्धेच्या शेवटच्या दोन कसोटींसाठी संघात समावेश केल्याची माहिती दिली. या निर्णयाच्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. काही चाहत्यांनी तनुषची निवड योग्य ठरवली. तर काहींनी कुलदीप यादव आणि अक्षर पटेलसारख्या खेळाडूंकडे दुर्लक्ष करून योग्य नसल्याचे सांगितले. आता भारतीय कर्णधार रोहित शर्माने तनुषच्या निवडीमागची संपूर्ण कहाणी सांगितली आहे.
कुलदीप यादव आणि अक्षर पटेल उपलब्ध नसल्याची माहिती रोहित शर्माने पत्रकार परिषदेत दिली. त्याने सांगितले की कुलदीप 100% तंदुरुस्त नाही, तर अक्षर पटेल बाबा झाल्याने रजेवर आहे. रोहित म्हणाला, “तनुष कोटियन एका महिन्यापूर्वी ऑस्ट्रेलियात खेळला. कुलदीपला व्हिसा आहे आणि तो 100 टक्के तंदुरुस्त नाही. अक्षराला नुकतेच बाळ झाले आहे. त्यामुळे तनुष तयार आहे, जर आम्हाला या आणि सिडनी सामन्यात दोन स्पीनरची गरज भासल्यास, बॅकअपची गरज आहे. तनुषने दाखवून दिले आहे की तो काय सक्षम आहे.
Rohit Sharma said – “Tanush Kotian played here in Australia. Kuldeep I don’t think he has a visa & He is not 100% fit. Axar has a baby recently. Tanush is ready, we really want a back up in case we need two spinners here or Sydney. Tanush has shown what he’s capable of”. pic.twitter.com/RENGfHXyTY
— Tanuj Singh (@ImTanujSingh) December 24, 2024
मुंबईतील 26 वर्षीय अष्टपैलू तनुष कोटियनची गणना प्रतिभावान खेळाडूंमध्ये केली जाते. त्याने 33 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत आणि 25.70 च्या सरासरीने 101 बळी घेतले आहेत. त्याने 47 डावांमध्ये 41.21 च्या सरासरीने दोन शतके आणि 13 अर्धशतकांसह 1525 धावा केल्या आहेत. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारत अ संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा तो भाग होता. त्याने एक सामना खेळला ज्यात त्याने 44 धावा केल्या आणि एक विकेट देखील घेतली.
कोटियनने मुंबईच्या 2023-24 च्या रणजी ट्रॉफीच्या विजयी मोहिमेत मोठी भूमिका बजावली होती. त्याने 41.83 च्या सरासरीने 502 धावा केल्या आणि 16.96 च्या सरासरीने 29 बळी घेतले. या कामगिरीमुळे त्याला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार मिळाला. 500 धावा आणि 25 बळींचा सीझन दुहेरी पूर्ण करणारा कोटियन हा एकमेव खेळाडू होता.
हेही वाचा-
चॅम्पियन्स ट्राॅफी पूर्वी इंग्लंडला धक्का! कसोटी कर्णधार बेन स्टोक्स गंभीर दुखापती
रोहित शर्माने दुखापतीबाबत दिला मोठा अपडेट, जाणून घ्या चौथी कसोटी खेळणार की नाही?
IND vs AUS: चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग-11, या खेळाडूला संधी मिळणार?