---Advertisement---

“कधीच नाही विसरणार तो क्षण…” टी20 विश्वचषक फायनलमध्ये घेतलेल्या झेलवर सूर्यकुमारनं दिली प्रतिक्रिया

On: सोमवार, जुलै 29, 2024 10:45 PM
Suryakumar Yadav
---Advertisement---

भारतानं 2024चा आयसीसी टी20 विश्वचषक (ICC T20 World Cup) जिंकलेला सोमवारी (29 जुलै) रोजी एक महिना पूर्ण झाला. यानिमित्तानं टीम इंडियाचा सध्याचा टी20 कर्णधार सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या फायनल सामन्यातील डेव्हिड मिलरचा (David Miller) ‘मॅच टर्निंग कॅच’ आठवला.

2024चा टी20 विश्वचषकाचा फायनल सामना ब्रिजटाउन, बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल या स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यादरम्यान सूर्यकुमारनं एक शानदार झेल घेतला जो भारतासाठी सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला होता. सूर्यानं हा अप्रतिम झेल सीमारेषेपलीकडून घेतला आणि दक्षिण आफ्रिकेचा विध्वसंक खेळाडू डेव्हिड मिलरला (David Miller) तंबूत पाठवले. या झेलच्या जोरावर भारतानं विजेतेपदाचा सामना 7 धावांनी जिंकला होता.

बीसीसीआयनं (BCCI) आज आपल्या ‘एक्स’ अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये सूर्यकुमार म्हणाला, “मी हे नेहमी लक्षात ठेवीन, मी माझ्या सराव सत्रात यापैकी बरेच काही केलं आहे, परंतू विश्वचषक फायनल सामन्यात आणि अशा दबावाच्या परिस्थितीत ही संधी येईल असे मला वाटलं नव्हतं. तो म्हणाला, अशा आव्हानात्मक क्षणांसाठी मी नेहमीच मेहनत घेतली आहे. तो अनेकदा अशा झेलांचा सराव करत राहतो आणि प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक वेळी हा झेल माझ्या लक्षात राहील.”

 

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ दिग्गज खेळाडूच्या रुपात भारतीय संघाला मिळणार नवा गोलंदाजी प्रशिक्षक?
गुलाबी साडी घालून नीता अंबानींचा पॅरिसमध्ये जबरदस्त भांगडा, व्हिडिओ तुफान व्हायरल
34 वर्षानंतर भारताला मिळाले आशिया चषकाचे यजमानपद…!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---