---Advertisement---

ब्रेकींग! टीम इंडियाने झिम्बाब्वे दौऱ्यासाठी बदलला कर्णधार; शिखरची गच्छंती तर…

On: गुरूवार, ऑगस्ट 11, 2022 9:50 PM
Team-India
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे.‌ या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा यापूर्वीच केली गेली होती. आता मात्र ऐन दौऱ्याआधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संघात मोठा बदल केला आहे. दौऱ्यासाठी यापूर्वी घोषित झालेला कर्णधार शिखर धवनच्या जागी पुनरागमन करत असलेल्या केएल राहुलची नियुक्ती केली गेली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली. राहुल कर्णधार असला तरी, शिखर संघात कायम असून तो उपकर्णधार असेल. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने परवानगी दिल्यानंतरच राहुलचा संघातील पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

सलामीवीर केएल राहुलकडे आधीच आशिया कप २०२२ साठी भारतीय संघाचे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. हर्नियाच्या दुखापतीमुळे तो दीर्घकाळ संघाबाहेर होता. आयपीएल २०२२ नंतर तो मायदेशातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून आणि इंग्लंड दौऱ्यातून बाहेर पडला होता. यानंतर, कोविड-१९ मूळे‌ तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत भाग घेऊ शकला नव्हता.

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी जवळपास सर्वच प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि रिषभ पंत या नावांचा समावेश आहे. त्याचबरोबर हार्दिक पंड्या आणि मोहम्मद शमी हे देखील संघात नाहीत. धवनने अलीकडेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने वेस्ट इंडीजला क्लीन स्वीप करण्याची कामगिरी केली होती.

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ-

भारतीय संघ: केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर.

महत्त्वाच्या बातम्या-

INDvsPAK: दुबईचे मैदान अन् रोहित शून्यावर बाद! चाहत्यांच्या कायम लक्षात राहिलेला ‘तो’ सामना

Asia Cup 2022 | पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी विराटने सुरू केला सराव, पाहा व्हिडिओ

Asia Cup 2022 | बुमराहच्या अनुपस्थितीत चमकदार कामगिरी करू शकतात भारताचे ‘हे’ तीन गोलंदाज

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---