---Advertisement---

INDvsPAK: दुबईचे मैदान अन् रोहित शून्यावर बाद! चाहत्यांच्या कायम लक्षात राहिलेला ‘तो’ सामना

On: गुरूवार, ऑगस्ट 11, 2022 7:32 PM
Rohit-Sharma
---Advertisement---

दुबईमध्ये खेळल्या जाणाऱ्या एशिया कप (Asia Cup) २०२२ स्पर्धतील पहिला सामना २७ ऑगस्टला खेळला जाणार आहे. तर भारतीय संघ त्यांचा पहिला सामना पाकिस्तान (INDVsPAK) विरुद्ध खेळणार आहे. हा सामना २८ ऑगस्टला खेळला जाणार आहे. या स्पर्धेत भारताचे नेतृत्व रोहित शर्मा तर पाकिस्तानचे नेतृत्व बाबर आझम करणार आहे. हा सामना दुबई इंटरनेशनल स्टेडियमवर खेळला जाणार असून रोहितचे या मैदानावर खास काही विक्रम नाही. या मैदानावर मागील वर्षी झालेल्या टी२० विश्वचषक साखळी फेरीतील पाकिस्तान विरुद्धचा सामना रोहित काय भारतीय क्रिकेट चाहत्यांच्याही चांगला लक्षात असेल.

विराट कोहली (Virat Kohli) याच्या नेतृत्वाखाली भारताने टी२० विश्वचषक २०२१ खेळला. तर भारताने पाकिस्तान विरुद्धचा सामना १० विकेट्सने गमावला. याच पराभवामुळे भारताला उपांत्य फेरीच्या बाहेर व्हावे लागले. या सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्मा एक चेंडू खेळताच शून्यावर बाद झाला.

शाहीन आफ्रिदीसमोर भारताचे ओपनर्स गारद

टी२० विश्वचषक गट २मधील भारत आणि पाकिस्तान समोरासमोर आले होते. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या या सामनात बाबरने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. भारताने २० षटकात ७ विकेट्स गमावत १५१ धावा केल्या. ज्यामध्ये सामन्याच्या चौथ्याच चेंडूवर रोहितने त्याची विकेट गमावली. या सामन्यात विराटने ५७ धावा आणि य़ष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत याने ३९ धावा केल्या. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने चमकदार कामगिरी करत ३ विकेट्स घेतल्या. त्याने रोहित, विराट आणि केएल राहुल यांना बाद केले. हा सामना पाकिस्तानने एकही विकेट न गमावता आणि १३ चेंडू शिल्लक राखत जिंकला.

दुबईच्या मैदानावर रोहितची कामगिरी

रोहितने या मैदानावर एकूण ४ टी२० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने १०० धावा केल्या असून ५६ त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. ही धावसंख्या त्याने मागील वर्षीच्या टी२० विश्वचषकात नामिबिया विरुद्ध केली. रोहितने त्याच्या आंतरराष्ट्रीय टी२० च्या कारकिर्दीत ४ शतके झळकावली असून एकूण ३४८७ धावा केल्या आहेत. यामध्ये २७ अर्धशतकांचादेखील समावेश आहे.

टी२०मध्ये रोहित विरुद्ध पाकिस्तान

एशिया कपमध्ये रोहित पाकिस्तान विरुद्ध सर्वाधिक धावा करण्याऱ्या भारतीय खेळाडूंपैकी एक असला, तरी त्याची टी२० प्रकारातील कामगिरी निराशाजनक आहे. त्याने पाकिस्तान विरुद्ध ८ टी२० सामने खेळताना ७० धावा केल्या आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

चेस ऑलिंपियाड: भारताचे नियोजन पाहून विदेशी अधिकारीही झाले हवालदिल, खर्चाची रक्कम वाचून तुम्हीही..

Asia Cup 2022 | पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी विराटने सुरू केला सराव, पाहा व्हिडिओ

Asia Cup 2022: टीम इंडियामध्ये होणार मोठा बदल! ‘या’ खेळाडूची जागा धोक्यात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---