---Advertisement---

रवी शास्त्री अडकले अलिबागमध्ये, आता घेणार बीअरचा आनंद

On: गुरूवार, मे 7, 2020 8:41 AM
---Advertisement---

भारतात सध्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु झाले आहे. पण या दरम्यान काही राज्यांमधील दारु विक्री करणारी दुकाने तसेच आणखी काही दुकानांवरील निर्बंध हटवून नियम शिथिल करण्यात आले आहेत.

त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री देखील आता बीअर घेऊन येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर लॉकडाऊन दरम्यान बीअर पिण्यासाठी शास्त्रींनी दोन सहकाऱ्यांच्या नावाचा खुलासा केला आहे. त्यांनी त्यांचे माजी संघसहकारी रॉजर बिन्नी आणि लक्ष्मण शिवरामकृष्णन यांची नावे घेतली आहेत.

सध्या या लॉकडाऊन दरम्यान शास्त्री अलिबागमध्ये त्यांच्या घरी आहेत. आलीबाग हे ऑरेंज झोनमध्ये आहे. त्यांनी सोनी स्पोर्ट्सला दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला. त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की या लॉकडाऊनमध्ये १९८५ च्या भारतीय संघातील कोणत्या सदस्याबरोबर हँगआऊट करायला आवडेल.

त्यावर उत्तर देताना शास्त्रींनी सांगितले की ‘साथीदारांसह बीअर पिण्यासाठी शिवा आणि रॉजर हे माझ्या यादीत अव्वल क्रमांकावर असतील.’

ते पुढे म्हणाले, ‘सध्या या लॉकडाऊनमध्ये मी रेड झोन पार केला आहे आणि सध्या मी आलीबागमध्ये ऑरेंज झोनमध्ये आहे. मी आज रात्री बीअर घेऊन येईल. मला खात्री आहे की कोणतेतरी शॉप नक्की उघडे असेल. आणि जर मला माझ्याबरोबर बिअर घेण्यासाठी २ जणांना घेऊन जायचे असेल तर मला खात्री आहे की रॉजर माझ्याबरोबर येईल आणि शिवा देखील येईल.’

याबरोबरच शास्त्रींना त्यांच्यातील आणि पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू जावेद मियाँदादमध्ये १९८५ च्या वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात झालेल्या स्लेजिंगबद्दलही विचारण्यात आले.

त्याबद्दल शास्त्री म्हणाले की मियाँदाद सातत्याने बडबड करुन शास्त्रींचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्यांनी पूर्ण लक्ष सामन्यावर केंद्रित केले होते. त्या सामन्यात शास्त्रींनी नाबाद ६३ धावांची खेळी करत भारताला सामना जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. या मालिकेत शास्त्री मालिकावीर ठरल्याने त्यांना ऑडी ही गाडी बक्षीस म्हणून मिळाली होती.

असे असले तरी शास्त्रींनी म्हटले आहे की मियाँदाद एक चांगला खेळाडू असून चांगला प्रतिस्पर्धीही आहे.

ट्रेंडिंग घडामोडी – 

धोनीने कुत्र्याकडून करुन घेतला कॅचचा जोरदार सराव, साक्षी मात्र या कारणाने वैतागली

भारताकडून खेळला केवळ ३ वनडे, आज आहे एका राज्याचा क्रीडामंत्री

केकेआरसह या तीन क्रिकेट टीमचा किंग खान होणार मालक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---