---Advertisement---

असे आहे टीम इंडियाचे २०२० मधील सामन्यांचे वेळापत्रक; पुणे-मुंबईमध्ये होणार हे सामने

On: शनिवार, डिसेंबर 28, 2019 12:20 PM
---Advertisement---

भारतीय संघ नवीन वर्षाची सुरुवात श्रीलंकेविरूद्ध 3 सामन्यांच्या टी20 मालिकेपासून करेल, मालिकेचा पहिला सामना 5 जानेवारीला गुवाहाटी येथे खेळला जाईल.

तसेच यावर्षी भारतीय संघासाठी सर्वात मोठे आव्हान ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी20 विश्वचषक आहे. हा विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. भारतीय संघ या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना 24 ऑक्टोबर 2020 ला खेळणार आहे.

तसेच या विश्वचषक मोहिमेपूर्वी भारतीय संघाला श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध सामने खेळायचे आहेत. यामध्ये भारतीय संघ दिड महिन्याचा न्यूझीलंड दौराही करणार आहे.

असे आहे भारतीय संघाचे 2020 चे वेळापत्रक –

#श्रीलंकेचा भारत दौरा – 2020

5 जानेवारी – पहिला टी20 सामना – गुवाहाटी

7 जानेवारी – दुसरा टी20 सामना – इंदोर

10 जानेवारी – तिसरा टी20 सामना – पुणे

#ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा – 2020

14 जानेवारी – पहिला वनडे – मुंबई

17 जानेवारी – दुसरा वनडे – राजकोट

19 जानेवारी – तिसरा वनडे – बंगळूरु

#भारताचा न्यूझीलंड दौरा – 2020

टी20 मालिका – 

24 जानेवारी – पहिला टी20 सामना – इडन पार्क, ऑकलंड

26 जानेवारी – दुसरा टी20 सामना – इडन पार्क, ऑकलंड

29 जानेवारी – तिसरा टी20 सामना – सेडन पार्क, हॅमिल्टन

31 जानेवारी – चौथा टी20 सामना – वेस्टपॅक स्टेडियम, वेलिंग्टन

2 फेब्रुवारी – पाचवा टी20 सामना – बे ओव्हल, तौरंगा

वनडे मालिका – 

5 फेब्रुवारी – पहिला वनडे – सेडन पार्क, हॅमिल्टन

8 फेब्रुवारी – दुसरा वनडे – इडन पार्क, ऑकलंड

11 फेब्रुवारी – तिसरा वनडे – बे ओव्हल, तौरंगा

कसोटी मालिका – 

21 – 25 फेब्रुवारी – पहिली कसोटी – बासिन रिसर्व, वेलिंग्टन

29 – 4 मार्च फेब्रुवारी – दुसरी कसोटी – हॅगली ओव्हल, ख्रिस्टचर्च

#दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा – 2020

12 मार्च – पहिला वनडे – धरमशाला

15 मार्च – दुसरा वनडे – लखनऊ

18 मार्च – तिसरा वनडे – कोलकता

#विश्वचषक 2020, ऑस्ट्रेलिया – 

साखळी फेरीतील भारताचे सामने-

24 ऑक्टोबर – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पर्थ स्टेडियम, पर्थ

29 ऑक्टोबर – भारत विरुद्ध पात्रता फेरीतील ए 2 संघ, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न

1 नोव्हेंबर – भारत विरुद्ध इंग्लंड, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न

5 नोव्हेंबर – भारत विरुद्ध पात्रता फेरीतील बी 1 संघ, एडलेड ओव्हल, एडलेड

8 नोव्हेंबर – भारत विरुद्ध अफगानिस्तान, सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी

https://twitter.com/Maha_Sports/status/1210555677103382529

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---