---Advertisement---

Ind W vs Aus W: ऐतिहासिक सामन्यात टीम इंडियाचा पराभव, ऑस्ट्रेलियाने 19 धावांनी मारली बाजी

On: गुरूवार, फेब्रुवारी 19, 2026 8:16 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया महिला संघ आणि भारतीय महिला संघ यांच्यात ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसरा सामना १९ फेब्रुवारी रोजी खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने या मालिकेतील स्कोअर १-१ असा बरोबरीत आणला आहे. हरमनप्रीत कौरचा हा ३५६ वा आंतरराष्ट्रीय सामना होता आणि ती सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी खेळाडू ठरली. मात्र, या ऐतिहासिक सामन्यात हरमनप्रीत कौर अँड कंपनीला पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

​प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ५ गडी गमावून १६३ धावा केल्या होत्या. जॉर्जिया वॉलने ५७ चेंडूत ८८ धावांची शानदार खेळी केली. याशिवाय बेथ मूनीने ३९ चेंडूत ४६ धावा केल्या होत्या. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १२८ धावांची भागीदारी केली. तसेच, फीबी लिचफील्डने ५ चेंडूत ६ धावा केल्या, तर एलिस पेरीने १० चेंडूत ७ धावा केल्या. भारताकडून अरुंधती रेड्डीने सर्वाधिक २ बळी घेतले, तर रेणुका सिंगने १ बळी मिळवला.

​१६४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. शेफाली वर्माने २३ चेंडूत २९ धावा केल्या, तर स्मृती मानधनाने २४ चेंडूत ३१ धावांची खेळी केली. याशिवाय जेमिमा रॉड्रिग्सने ६ चेंडूत ४ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरने ३० चेंडूत ३६ धावा केल्या. भारताकडून एकही खेळाडू मोठी खेळी करण्यात यशस्वी ठरला नाही. भारतीय संघ २० षटकांत ९ गडी गमावून केवळ १४४ धावाच करू शकला. अखेर ऑस्ट्रेलियाने १९ धावांनी विजय मिळवला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---