भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कांबळीच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली आहे. या माजी क्रिकेटपटूला काही दिवसांपूर्वी ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वृत्तानुसार, विनोद कांबळी यांच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या जमा झाल्या होत्या आणि त्यांना नीट चालताही येत नव्हते. त्यामुळे कांबळी यांच्यावर महाराष्ट्रातील रुग्णालयात उपचार सुरू होते.
उपचारानंतर कांबळी यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा झाली आहे. विनोद कांबळीचा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून तुम्हाला समजेल की त्यांची तब्येत खरोखरच सुधारली आहे. कांबळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो हॉस्पिटलमध्ये डान्स करताना दिसत आहे.
पाहा व्हिडिओ-
Former India cricketer Vinod Kambli, currently recovering at a private hospital in Thane district, was seen in a video performing an energetic dance at the medical facility, a moment that left not only the staff but also social media buzzing.#indian #cricketer #VinodKambli pic.twitter.com/l7REpSzi70
— Salar News (@EnglishSalar) December 30, 2024
विनोद कांबळी ज्या रुग्णालयात दाखल होते. ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कांबळी हॉस्पिटलमध्ये डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कांबळी केवळ डान्सच करत नाही तर चक दे-चक दे इंडिया गातानाही दिसत आहे. डान्स करताना तो क्रिकेटचे काही शॉट्सही मारतोय. व्हिडिओमध्ये कांबळी खूप आनंदी आणि उत्साहित दिसत आहे. कांबळीच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे.
काही दिवसांपूर्वी देखील विनोद कांबळी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ते म्हणाले होते की, आज मी जिवंत आहे तर हॉस्पिटलच्या डॉक्टरांमुळेच जिवंत आहे. व्हिडिओमध्ये विनोद कांबळी म्हणतात की, आता डॉक्टर जे सांगतील तेच करेन. क्रिकेटशिवाय कांबळी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो.
हेही वाचा-
IND vs AUS; नव्या वर्षात सिडनीत रंगणार ‘गुलाबी कसोटी’ सामना; असा आहे ‘पिंक टेस्ट’चा इतिहास
गौतम गंभीरच्या कोचिंगमध्ये टीम इंडिया सुपर फ्लॉप! 16 लाजिरवाण्या विक्रमांची नोंद
भारत-ऑस्ट्रेलिया सोडा, हा संघही WTC फायनलमध्ये प्रवेश करू शकतो, जाणून घ्या समीकरण