---Advertisement---

संजू.. संजू.. स्टेडियममध्ये सुरू होती नारेबाजी, मग सॅमसनने केले असे काही की चाहते झाले फिदा!

Sanju-Samson-Video
---Advertisement---

भारतीय संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर असून उभय संघात ३ सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (२० ऑगस्ट) हरारे स्पोर्ट्स क्लब येथे झाला. या सामन्यात भारताने ५ विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यासह भारताने २-० च्या फरकाने वनडे मालिकाही जिंकली. या सामना विजयाचा नायक संजू सॅमसन राहिला. संजूने भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी खेळत सामनावीर पुरस्कार पटकावला.

या सामन्यादरम्यानचा (India vs Zimbabwe) संजूचा (Sanju Samson) एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. भारतीय संघ विजयाच्या नजीक असताना स्टेडियममध्ये उपस्थित चाहते संजूच्या नावाचे नारे लगावत होते. मग संजूनेही असे काही केले, ज्यामुळे चाहते त्याच्यावर फिदा झाले आहेत. 

सामन्यादरम्यान संजू पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत होता. ९७ धावांवर ४ महत्त्वाच्या विकेट्स गमावल्यानंतर संजूची खेळी संघासाठी उपयुक्त ठरली. तो फलंदाजी करत असताना सामना पाहायला आलेले भारतीय चाहते संजू-संजू असे (Indian Fans Chant Sanju) नारे लगावत होते. भारताच्या डावातील २६ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूनंतर भारतीय संघाला विजयासाठी फक्त एका धावेची गरज होती. परंतु संजूने चाहत्यांना निराश केले नाही. त्याने एक धाव घेत सामना न संपवता. षटकार मारत (Sanju Samson Match Winning Six) सामन्याचा दणकेबाज शेवट केला. 

त्याने इनोसेंट काइयाच्या २६व्या षटकातील चौथ्या चेंडूवर खणखणीत षटकार मारत सामना संपवला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संजूची आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सनेही या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दरम्यान झिम्बाब्वेच्या १६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना संजूने मॅच विनिंग प्रदर्शन केले. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत संजूने ३९ चेंडूत ४ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने नाबाद ४३ धावा केल्या. तसेच त्याने खणखणीत षटकार मारत संघाला सामन्यासह मालिकाही जिंकून दिली. आता भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघातील शेवटचा सामना २२ ऑगस्टला होईल.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

मन जिंकलस! कँसर पिडीत चिमुकल्याची मागणी केली झटक्यात पूर्ण, त्याक्षणी संजू झाला इमोशनल

राष्ट्रगीताला न थांबणाऱ्या महान क्रिकेटरची कॉलर पकडणारा डाव्या हाताचा ऑस्ट्रेलियाचा लक्ष्मण

एकेकाळच्या वर्ल्डचॅम्पियनला घ्यावी लागतेय व्हिल चेअरची मदत, गांजाच्या सेवनामुळे ओढावली परिस्थिती

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---