भारतीय संघ ब्रिस्बेन येथे होणार चौथा कसोटी सामना खेळणार नव्हता. मात्र आता भारतीय संघ एका अटीवर ब्रिस्बेन येथील चौथा कसोटी सामना खेळण्यास तयार झाला आहे. भारतीय संघ चौथा चौथा सामना संपताच लगेच भारतासाठी रवाना होईल. याचे कारण हे आहे की सध्या ब्रिस्बेन येथे कोरोना व्हायरसच्या नवीन प्रकरणामुळे अडचणी वाढवल्या आहेत. त्यामुळे भारतीय संघाचे म्हणणे आहे की, वारंवार क्वारंटाइन होण्याने इंग्लंड विरुद्धच्या मालिकेवर याचा परिणाम होईल.
ऑस्ट्रेलियामधून भारतात येण्यासाठी कोणत्याही प्रकारची निर्बंध घालण्यात आलेले नाही. मात्र यूकेत कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळल्याने क्वारंटाइनच्या नियमात थोडे बदल केले आहेत. यामुळे बीसीसीआयच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता जे नियम आहेत त्यानुसार यूके मधून येणार्या प्रवाशांना एका आठवड्यासाठी इंस्टीट्यूशनल क्वारंटाइन व्हावे लागणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एका आठवड्यासाठी होम क्वारंटाइन राहावे लागणार आहे. भारतीय संघ 19 जानेवारीला ऑस्ट्रेलिया मधून भारतासाठी रवाना होणार आहे. त्यानंतरच इंग्लंड विरुद्ध 5 फेब्रुवारी पासून मालिकेला प्रारंभ करणार आहे.
भारतीय संघाने ब्रिस्बेन येथे जाण्यास दिला होता नकार
यापूर्वी भारतीय संघाने ब्रिस्बेन येथे चौथा कसोटी सामना खेळायला जाण्यास क्वारंटाइनच्या कडक नियमामुळे नकार दिला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा वाईट बातमी आहे की, ब्रिस्बेन येथे तीन दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या अडचणी वाढ निर्माण झाली आहे
भारतीय संघासाठी चिंतेची अजून एक गोष्ट म्हणजे ब्रिस्बेन येथे गेल्यावर भारतीय संघाला कदाचित क्वारंटाइनच्या कडक नियमांचे पालन करावे लागू शकते. जर परिस्थिती अशीच राहिली तर मग भारतीय संघाला रूम्समधून बाहेर पडता येणार नाही. त्यामुळे फक्त सराव सत्र आणि अंतिम सामना खेळण्यासाठी भारतीय संघ बाहेर पडू शकतो.