---Advertisement---

बॉक्सिंग डे कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, ‘हे’ दोन खेळाडू करणार पदार्पण

---Advertisement---

शनिवारपासून(२६ डिसेंबर) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. हा सामना ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. या सामन्यासाठी भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघाची घोषणा झाली आहे. या सामन्यात अजिंक्य रहाणे प्रभारी कर्णधार असणार आहे.

तसेच या सामन्यासाठी भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघात मोहम्मद सिराज आणि शुबमन गिल यांना संधी मिळाली आहे. त्यामुळे ते या सामन्यातून कसोटी पदार्पण करतील.

या व्यतिरिक्त रिषभ पंतला वृद्धिमान साहा ऐवजी यष्टीरक्षक म्हणून संधी मिळाली आहे. तर रविंद्र जडेजाचेही भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. मात्र सर्वांना अपेक्षित असणाऱ्या केएल राहुलला अंतिम ११ जणांच्या संघात संधी देण्यात आलेली नाही.

पहिल्या सामन्यात खेळलेला पृथ्वी शॉ याला अंतिम ११ मधील स्थान गमवावे लागले आहे.

असा आहे ११ जणांचा भारतीय संघ – 

अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, शुभमन गिल, रिषभ पंत, मोहम्मद सिराज,

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---