भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव पुन्हा एकदा भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
मात्र कपिल देव यावेळी क्रिकेट नाही, तर गोल्फमध्ये भारतीय संघाकडून खेळताना दिसतील.
१९८३ साली भारताला प्रथम एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकून देणारे माजी दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव २०१८ आशिया पॅसिफिक सीनियर गोल्फ स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
या महिन्याच्या सुरवातीला नोएडाच्या जेपी ग्रीन्स गोल्फ कोर्समध्ये पार पडलेल्या ऑल इंडिया सीनियर गोल्फ स्पर्धेत दमदार कामगिरी करत कपिल देव २०१८ आशिया पॅसिफिक सीनियर गोल्फ स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
२०१८ ची आशिया पॅसिफिक सीनियर गोल्फ स्पर्धा १७ ते १९ ऑक्टोंबर जपानमधील मियाजाकी शहरातील टॉम वॉटसन गोल्फ क्लबवर होणार आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव भारताचे सर्वकालीन सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहेत.
What better way to celebrate @therealkapildev's birthday than reliving India's glorious victory in the 1983 @cricketworldcup Final at @HomeOfCricket! pic.twitter.com/K4Rw3inVcw
— ICC (@ICC) January 6, 2018
त्यांनी भारताकडून खेळलेल्या १३१ कसोटी सामन्यात ५२४८ धावा आणि ४३४ बळी मिळवेले आहेत.
तर २२५ एकदिवसीय सामन्यात ३७८३ धावांसह २५३ बळी मिळवले आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
-इंग्लंडचाच माजी गोलंदाज म्हणतो, टीम इंडियाला भुवीची कमतरता जाणवणार नाही
-खेळात मैत्री नाहीच! आयपीएलमधील मैत्री विसरुन हा खेळाडू आता काढणार भारतीय गोलंदाजांची पिसे