भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा नेहमीच शांत स्वभावासाठी ओळखला जातो. तसेच तो इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या समाजमाध्यमांच्या झगमगाटापासून तो दूर रहाणेच पसंत करतो. त्याचमुळे धोनी क्रिकेटच्या मैदानापासून दूर असला की त्याच्याबद्दल जाणून घेणे कठीण असते.
त्याच्या विषयीचा नवीन फोटो किंवा बातमी बघण्यासाठी त्याच्या चाहत्यांना धोनीच्या पत्नीच्या इन्स्टाग्रामचा आसरा घ्यावा लागतो. त्याने आपले एक जीवनमान ठरवून घेतले आहे आणि त्या चौकटीतच राहणे तो पसंद करतो. धोनीची आवड, निवड आणि त्याचे छंद याविषयी फक्त त्याच्या जवळच्या व्यक्तींना माहिती आहे, परंतु बाईक्स विषयी असणार धोनीच प्रेम जगजाहीर आहे.
धोनीजवळ बाइक्सचा चांगला संग्रह केला आहे. लोकांना त्याच्या बाइक्स प्रेमाबद्दल तेव्हा कळले होते, जेव्हा त्याने ट्विटरवर एक फोटो टाकला होता. धोनीने 2013 मध्ये एक ट्विट केलं होतं, त्यामध्ये त्याने त्याच्या पहिल्या बाईकचा फोटो शेयर केला होता. धोनीच्या संग्रही खूप साऱ्या बाइक्स असून, त्यात काही जुन्या काळातील देखील आहेत, धोनीच्या बाईक्सचा फोटो त्याची पत्नी साक्षीने देखील शेयर केला होता.
https://twitter.com/msdhoni/status/378067423296884736
साल 2017 च्या एका मुलाखतीत रवींद्र जडेजाने खुलासा केला होता की धोनीला स्वतः माहीत नाही की त्याच्याजवळ किती बाइक्स आहेत.
https://www.instagram.com/p/1NIV1tyuJf/
धोनीजवळ अनेक सुपरबाईक्स असून 2015 च्या आयपीएल स्पर्धेदरम्यान त्याने ‘कावासाकी निंजा एच2आर’ चा फोटो शेयर केला होता. त्याखाली त्याने लिहिले होते, ‘शेवटी प्रतीक्षा संपली. काही महिन्यांनी मी याची पहिली सफर करेल.’धोनी त्यावेळी आयपीएलमध्ये व्यस्त होता, त्यामुळे त्याला त्याच्या पहिल्या सफरीला वेळ लागला.
https://twitter.com/msdhoni/status/648075136722059264
साल 2020 च्या हिंदुस्थान टाइम्स च्या एका रिपोर्टनुसार, महेंद्रसिंग धोनी हर्ले डेव्हीड्सन फॅटबॉय, काँफोडरेट एक्स132 हेलकॅट, डुकाटी 1098 आणि निंजा जेडएक्स 14आर या गाड्यांचा मालक असून, तसेच त्याच्याजवळ हायबुझा देखील आहे. 2020 च्या लॉकडाऊन काळात तो यामाहा आरडी 350 चालवतांना दिसून आला होता, त्याच्यासोबत त्याची लाडकी लेक झिवा देखील सफरीचा आनंद घेत होती. तो व्हिडिओ त्याची पत्नी साक्षीने शेयर केला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडिया सावधान, न्यूझीलंडची ‘ही’ गोष्ट ठरु शकते घातक, माजी भारतीय दिग्गजाचा इशारा
अजिंक्य रहाणेला १२ वर्षांपूर्वी ‘द वॉल’ राहुल द्रविडने दिला होता ‘हा’ लाखमोलाचा सल्ला
इरफान पठाणचा वेगवान गोलंदाजांना सल्ला, ‘तुम्ही भुवनेश्वरवरून अख्तर बनू शकत नाही, त्या नादात तुम्ही…’