भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीनं (Virat Kohli) भारतानं 2024चा टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. कोहली सध्या कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळत राहणार आहे. परंतु टी20च्या निवृत्तीनंतर, कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधील त्याच्या भविष्याबद्दल अटकळ बांधली जात आहे. दरम्यान, भारताच्या माजी प्रशिक्षकानं कोहलीच्या भविष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
माजी प्रशिक्षक संजय बांगर (Sanjay Bangar) म्हणाले, “मला वैयक्तिकरित्या असे वाटते की विराट कोहलीने कसोटी संघाच्या कर्णधारपदास दीर्घ काळासाठी हाताळायला हवे होते, हा माझा विश्वास आहे की, तो या भूमिकेत आणखी पुढे जाऊ शकला असता.”
संजय बांगर (Sanjay Bangar) यांनी या जागतिक कसोटी 11 संघाची निवड केली आहे. त्यामध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) यांच्यासह 7 खेळाडूंना भारतातून स्थान देण्यात आले आहे. या संघात रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन, विराट कोहली, रिषभ पंत, बेन स्टोक्स, रवींद्र जडेजा, रवी अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, जोश हेजलवुड यांचा समावेश आहे.
विराट कोहलीच्या (Virat Kohli) आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं भारतासाठी 113 कसोटी, 295 एकदिवसीय आणि 125 टी20 सामने खेळले. 113 कसोटी सामन्यात त्यानं 49.15च्या सरासरीनं 8,848 धावा केल्या आहेत. 295 एकदिवसीय सामन्यात त्यानं 58.18च्या सरासरीनं 13,906 धावा केल्या. 125 टी20 सामन्यात त्यानं 48.69च्या सरासरीनं 4,188 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहलीनं 80 शतक झळकावले आहेत, तर कोहली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 शतक ठोकणारा जगातील पहिला फलंदाज आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
लखनऊ सुपर जायंट्स राहुलला कायम ठेवणार? आयपीएल 2025 लिलावापूर्वी संजीव गोयंकांची घेतली भेट
“माझं मन भरलं…” मुलाला पहिल्यांदाच भेटल्यावर शाहीन आफ्रिदी भावूक, पत्नीलाही दिला खास संदेश
धोनीच्या शहरात जसप्रीत बुमराहचा जलवा! डोक्यावर मुकुट घालून महाराजासारखी एन्ट्री