---Advertisement---

‘रोहितसेना’ने १००वी कसोटी खेळत असलेल्या विराटला दिला ‘गार्ड ऑफ ऑनर’, कोहलीनेही मानले सर्वांचे आभार

Indian-Team-Giving-Gaurd-Of-Honour
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याच्यासाठी श्रीलंकेविरुद्ध मोहाली (Mohali Test) येथे सुरू असलेला पहिला कसोटी सामना अतिशय महत्त्वाचा आहे. कारण हा त्याचा कसोटी कारकिर्दीतील १०० वा (Virat Kohli’s 100th Test) सामना आहे. त्याच्या कारकिर्दीतील या खास सामन्याला अजूनच खास बनवण्यासाठी भारतीय संघाने सामन्यापूर्वी त्याला विशेष टोपी भेट दिली होती. यानंतर आता शनिवारी (०५ मार्च) भारतीय खेळाडूंनी मिळून त्याला ‘गार्ड ऑफ ऑनर’ (Indian Team Give Guard Of Honour To Virat Kohli) दिला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय, BCCI) या खास क्षणाला कॅमेरात कैद करून सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. 

श्रीलंकेविरुद्धच्या मोहाली कसोटी सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली होती. प्रथम फलंदाजी करताना १२९.२ षटकांनंतर भारतीय संघाने ५७४ धावांवर त्यांचा डाव घोषित केला. हा पहिला डाव संपल्यानंतर सर्व भारतीय खेळाडू दुसऱ्या डावासाठी मैदानावर जमणार होते. यावेळी मैदानावर जाण्याआधी सर्वांनी एकत्र जमून विराटला गार्ड ऑफ ऑनर दिला. त्यानंतर श्रीलंकेच्या फलंदाजांना कमी धावसंख्येवर रोखण्यासाठी रणनिती आखली.

बीसीसीआयने या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत व्हिडिओला ‘खेळाचे सौंदर्य’ असा कॅप्शन दिला आहे.

आपल्या सर्व संघ सहकाऱ्यांकडून मिळालेल्या या सन्मानासाठी विराटने सर्वांचे आभार व्यक्त केले. त्यानंतर तो भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्याशी हात मिळवत त्याची गळाभेट घेतानाही दिसला.

सामन्यापूर्वीही केला गेला सन्मान
महत्त्वाचे म्हणजे, भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील मोहाली कसोटी सामना सुरू होण्यापूर्वीही विराटचा सन्मान केला गेला होता. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी विराटला खास टोपी भेट देत त्याचा सन्मान केला होता. यावेळी विराटला त्याच्या शंभराव्या सामन्यानिमित्त शुभेच्छाही दिल्या होत्या. तसेच या खास क्षणी विराटची पत्नी अनुष्का शर्मा तिथे उपस्थित होती. विराटला प्रशिक्षक द्रविडने कॅप दिल्यानंतर तिने त्याची गळाभेट घेतली. याबरोबरच विराटने सन्मान झाल्यानंतर भावुक होत प्रतिक्रियाही दिली.

कसोटी सामन्यांच्या शंभरेवेळी विशेष कॅप मिळाल्यानंतर विराट खूप खुश दिसून आला. तो म्हणाला की, “आज मला आणि माझ्या कुटुंबाला खूप अभिमान वाटत आहे. त्यातही राहुल द्रविड यांच्याकडून कॅप मिळणे, ही अजून जास्तच सन्मानाची गोष्ट होती. कारण मी बालपणी त्यांना खेळताना पाहात मोठा झालो आहे.”

महत्त्वाच्या बातम्या-

दक्षिण आफ्रिका महिला संघाची विश्वचषकात विजयी सलामी; बांगलादेशला चारली धूळ

एकाच दिवशी तब्बल पाच आंतरराष्ट्रीय सामन्यात वाहिली गेली वॉर्नला श्रद्धांजली; रोहित-विराट म्हणाले…

ना धोनी, ना कपिल देव; दिग्गजांना मागे टाकत श्रीलंकेविरुद्ध दीडशतक ठोकणारा जडेजा बनला अव्वल नंबरी 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---